एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे.
या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या यशात विराट कोहलीचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे.
इंग्लंड दौऱ्यावर आल्यानंतर विराट कोहलीने, जर भारतीय संघ जिंकला तर मला माझ्या फॉर्मची चिंता नाही. मी इथे क्रिकेटचा आनंद घ्यायला आलो आहे. असे वक्तव्य केले होते.
मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनने विराट कोहलीच्या या वक्तव्यावर जोरदार टिका करत विराट खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.
“विराटने धावा केल्या नाही तर त्याला खरचं काही फरक पडणार नाही का? मला असे वाटते की विराट खोटे बोलत आहे.” असे जेम्स अॅंडरसन विराटवर टिका करत म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या:






