सोमवारी (23 जुलै) श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा पराभवाचा धक्का देत व्हाइटवॉश दिला. मात्र श्रीलंकेने जरी हा विजय मिळवला असला तरी त्यांच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
नॉर्वेच्या एका महिलेने हॉटेल रुममध्ये तिचा बलात्कार केल्याचा आरोप श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनथिलकालाच्या मित्रावर केला आहे आणि त्यावेळी त्या हॉटेल रुममध्ये दनुष्काही उपस्थित होता. त्यामुळे या प्रकणाची चौकशी होईपर्यंत दनुष्का गुनथिलकाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे.
दनुष्का आणि त्याचा मित्र रविवारी पहाटे श्रीलंकन खेळाडू राहत असलेल्या हॉटेलमध्ये नॉर्वेच्या दोन महिलांना घेऊन गेले होते. त्यानंतर त्यातील एका महिलेने दनुष्काच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. हा मित्र श्रीलंकन वंशाचा आहे आणि त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे.
तसेच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी सांगितले की दनुष्का गुनथिलकावर कोणताही आरोप नाही.
असे असले तरी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने रविवारी रात्री दनुष्का गुनथिलकावर अचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत त्याचे निलंबन केले आहेे. पण त्याला सोमवारी उर्वरीत सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली होती.
तसेच श्रीलंका क्रिकेटच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, “संघ व्यवस्थापनेने दनुष्का गुनथिलकावर अचारसंहितेचा भंग केल्याचा रिपोर्ट दिला आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेटने आयोजित केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर त्याच्यावर बंदीचा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ”
दनुष्का गुनथिलका या आधीही बऱ्याचदा अनेक वादात अडकला आहे. याआधीही 2017 मध्ये त्याच्यावर मर्यादित षटकांच्या काही सामन्यांवर बंदी घालण्यात आली होती. तसेच पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघातून त्याला वगळण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाकिस्तानी गोलंदाजाची चालाखी, पहा कसे केले सेलिब्रेशन
–टीम इंडियाच्या खेळाडूंना पुढील एक महिन्यासाठी रहावे लागणार पत्नीपासून दूर?