---Advertisement---

चेन्नई आणि वानखेडेचं खास नातं, जुळून आला खास योगायोग

On: बुधवार, मे 23, 2018 8:37 AM
---Advertisement---

मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने  २ विकेटने विजय मिळवला. याबरोबर त्यांनी आयपीएल २०१८ची अंतिम फेरी गाठली.

जेव्हा आयपीएल २०१८ची सुरूवात झाली होती तेव्हा याच मैदानावर चेन्नईने विजय मिळवला. तेव्हा गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या ३ षटकांत ४७ धावा लागत असताना आणि केवळ ३ विकेट्स बाकी असताना चेन्नईने विजय मिळवला.

कालही चेन्नईला ३ षटाकांत ४३ धावा हव्या होत्या आणि ३ विकेट्स बाकी होत्या. तरीही चेन्नईने केन विलियमसनच्या हैद्राबादला कोणतीही संधी न देता २ विकेट्सने विजय मिळवला.

याचमुळे चेन्नई विक्रमी ७व्यांदा अंतिम फेरीत खेळत आहे. तसेच शेवटचा सामनाही चेन्नई याच मैदानावर २७मे रोजी खेळणार असल्यामुळे चाहते खुश आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment