११८वर्षे जुन्या डेविस कपच्या स्पर्धेत २०१९पासून १८ संघ खेळणार असून आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने(आयटीएफ) याला मान्यता दिली आहे. ओरलॅंड येथे झालेल्या वार्षिक चर्चेत यासंदर्भात हे निर्णय घेण्यात आले.
तसेच या स्पर्धेला जपानचे बिलिनीयर हिरोशी मिकीटानी यांनी २५ वर्षापासून ३ बिलियन डॉलरचे सहकार्य केले आहे. पुरूषांसाठीच्या या स्पर्धेला यावेळी १२० निमंत्रिंतांपैकी ७१.४३ टक्के एवढे मतदान झाले.
आयटीएफचे अध्यक्ष डेविड हॅगर्टी यांच्या बरोबरच बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू जेरार्ड पीके याचा कोसमोस ग्रुपही यामध्ये सहभागी झाला होता. पीके हा मतदान करण्यासाठी स्पेनवरून आला होता.
What a week we've had in Orlando for the 2018 ITF AGM culminating in the historic vote to change the format of @DavisCup! pic.twitter.com/dVFvElM4jc
— ITF (@ITFTennis) August 16, 2018
आयटीएफसाठी आणि या स्पर्धेचे सभासद असलेल्या देशांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच या देशांतील खेळांचे भविष्य चांगले होईल असा विश्वास हॅगर्टी यांनी व्यक्त केला आहे. युएसच्या लॅरी एलिसन यांना २०२१ इंडियन वेल्स टेनिसचा अंतिम सामना आयोजित करण्याची इच्छा दर्शविली.
सध्या डेविस कपची बाद फेरी फेब्रुवारी, जुलै, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये घरच्या आणि देशाच्या बाहेर होतात. वेळापत्रकाची सांगड घालताना खेळाडूंची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे काही मोठ्या खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घ्यायला गेल्या काही वर्षांपासून सुरुवात केली होती. तसेच स्पर्धेत बेस्ट आॅफ ५ चे सेट होत असत.
नवीन संकल्पनेनुसार आता नोव्हेंबरमध्ये १८ संघात ही स्पर्धा होईल. यातील घरच्या आणि परदेशात खेळलेल्या २४मधून १२ विजेते फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सामन्यांसाठी पात्र ठरतील. तर चार विजेते गेल्यावर्षीच्या उपांत्य फेरीतील आणि २ बाद फेरीतून निवडले जाणार आहेत.
From 2019, the competition will see 18 nations and the world’s best players compete in a week-long season finale to be crowned #DavisCup champions.
Here’s the new calendar…
Find out more: https://t.co/hprNmHUcqg pic.twitter.com/E3POfiZzeF
— Davis Cup (@DavisCup) August 16, 2018
दोन एकेरी आणि एक दुहेरी असे रोज तीन सामने होणार असून ते सगळे तीन सेटमध्ये खेळले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन लॉन टेनिस संघटनेने (एलटीए) याला विरोध दर्शविला आहे. ‘पैसा मिळवण्याचा मार्ग’ आणि ‘सध्याच्या पद्धतीतून माघार’ असा शब्दांत ऑस्ट्रेलिया डेविस कपचा कर्णधार लेटन हेवीटने विरोध केला.
Sometimes it’s more than a game. More than money. Most of my biggest highs and toughest loses came in 5 set epic Davis Cup matches in front of screaming home or away fans. For the ITF to take that away from the next generation of future stars is a disgrace. #SorryDwightDavis pic.twitter.com/7Bx7Zdilcn
— Lleyton Hewitt (@lleytonhewitt) August 17, 2018
“डेविस कप झाल्यानंतर सहा आठवड्यात एटीपीच्या सामन्याचे आयोजन करणे म्हणजे मुर्खपणाची बाब” असे एटीपीचे कार्यकारी अध्यक्ष क्रिस केरमोड म्हणाले.
एटीपीच्या २०२०च्या सामन्यांचे आयोजन आधीच एलटीएने केले असून त्यांना या नवीन बदलांबद्दल चिंता आहे. तर या नंतर ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धाही आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार
–एशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर