---Advertisement---

विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी

---Advertisement---

ब्रिस्बेन | भारताच्या बहुचर्चित आॅस्ट्रेलिया दौऱ्याला आज सुरुवात होत आहे. द गाबा, ब्रिस्बने येथे होत असलेल्या टी२० सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील आजचा हा सामना भारतासाठी खूप अर्थांनी महत्त्वाचा आहे.

या टी२० मालिकेत संघाचे नेतृत्व भारतीय संघाचा पुर्णवेळ कर्णधार विराट कोहली करणार आहे. विराटला विंडीजविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.

विराट- रोहितला रैनाचा विक्रम मोडण्याची संधी-

या टी२० मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. सर्व प्रकारच्या टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू होण्याची मोठी संधी विराट आणि रोहितकडे आहे.

सध्या हा विक्रम भारताच्या सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैनाने २९६ टी२० सामन्यात आजपर्यंत ३३.५९च्या सरासरीने ७९२९ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने २४७ सामन्यात ४०.७५च्या सरासरीने ७७४४ धावा केल्या आहे. दुसऱ्या बाजूला रोहितनेही २९२ सामन्यात ३२.६४च्या सरासरीने ७६७१ धावा केल्या आहेत.

भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत ३ सामने खेळणार असल्यामुळे विराच- रोहितला हा विक्रम करण्याची मोठी संधी आहे. जर हा विक्रम आता झाला नाही तर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेपर्यंत त्यांना वाट पाहणी लागणार आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

या गोष्टीसाठी विराट कोहली- रोहित शर्मामध्ये आहे काॅंटे की टक्कर...

१४१ वर्षांतील सर्वात मोठा पराक्रम करण्याची विराटला संधी

टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया...

संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment