---Advertisement---

रोहित की विराट? कोण जिंकणार ती खास रेस

On: बुधवार, नोव्हेंबर 21, 2018 11:16 AM
---Advertisement---

ब्रिस्बेन | भारताच्या बहुचर्चित आॅस्ट्रेलिया दौऱ्याला आज सुरुवात होत आहे. द गाबा, ब्रिस्बने येथे होत असलेल्या टी२० सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील आजचा हा सामना भारतासाठी खूप अर्थांनी महत्त्वाचा आहे.

या टी२० मालिकेत संघाचे नेतृत्व भारतीय संघाचा पुर्णवेळ कर्णधार विराट कोहली करणार आहे. विराटला विंडीजविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.

यामुळे विराटच्या नावावर असलेला एक खास विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडूचा विक्रम विंडीज मालिकेत रोहितच्या नावावर झाला.

रोहितने टी२० कारकिर्दीत ८७ सामन्यात ३३.४३च्या सरासरीने २२०७ धावा केल्या आहेत तर विराटने ६२ सामन्यात ४८.८८च्या सरासरीने २१०२ धावा केल्या आहेत.

सध्या रोहितच्या टी२०मधील धावा विराटपेक्षा १०५ धावांनी पुढे आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत कोण जास्त धावा करतो यावर हा विक्रम अवलंबून असणार आहे.

२०१८ वर्ष हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादीत षटकांचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी जबरदस्त ठरले. यावर्षी भारतीय संघाकडून या दोन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

१४१ वर्षांतील सर्वात मोठा पराक्रम करण्याची विराटला संधी

टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया...

संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment