भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतेच तीन सामन्यांची एकदीवसीय मालिका पार पडली. यामध्ये भारताला इंग्लंडकडून २-१ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले होते.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या त्यावेळी चर्चा होत्या.
या चर्चेला इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर पंचाकडून एमएस धोनीने सामन्याचा दुसऱ्या डावातील चेंडू मागून घेतला होता.
त्यामुळे तेव्हा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला आणखी जोर आला होता.
शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील आठवण म्हणून धोनीने पंचाकडून चेंडू घेतला आहे. अशा चर्चेने सोशल मिडियावर जोर धरला होता.
मात्र मुंबई येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात धोनीने पंचाकडून चेंडू का घेतला होता याचा खुलासा खुद्द धोनीने केला आहे.
“लॉर्ड्सवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांचे चेंडू रिव्हर्स स्विंग होत नव्हते. त्यामुळे मी पंचांना विनंती करुन तो चेंडू आमचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना दाखवण्यासाठी घेतला होता. २०१९ ला इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. त्यापूर्वी आम्हाला आमच्या गोलंदाजांकडून चेंडू स्विंग न होण्याच्या समस्येवर तोडगा काढने महत्वाचे आहे. पंचाकडू त्या सामन्यातील चेंडू मागून घेण्यामागे हे कारण होते.” असे धोनीने सांगितले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-उपकर्णधार या नात्याने रहाणेची काहीच जबाबदारी नाही का?
-हे विधान करुन सचिनने एकप्रकारे पृथ्वी शाॅला टीम इंडियात घेण्याचे सुचीत केले असावे