fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तब्बल २६ वर्षांनंतर पर्थमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली बनला केवळ चौथा भारतीय

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. आज भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला आहे. तसेच भारत या सामन्यात 43 धावांनी पिछाडीवर आहे.

या डावात भारतीय कर्णधार विराट कोहलीने 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटने 214 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले असून हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक आहे.

तसेच आॅस्ट्रेलियामधील पर्थमध्ये कसोटी शतक करणारा विराट केवळ चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी पर्थमध्ये सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ आणि सचिन तेंडुलकर यांनी शतके केली आहेत.

विशेष म्हणजे गावसकर आणि अमरनाथ यांनी एकाच सामन्यात आणि एकाच डावात शतके केली आहेत. त्यांनी पर्थमध्ये 16-21 डिसेंबर 1977 दरम्यान आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शतके केली होती. गावसकर यांनी 127 धावा आणि अमरनाथ यांनी 100 धावा केल्या होत्या.

तसेच सचिनने 1-5 फेब्रुवारी 1992 दरम्यान आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 114 धावांची खेळी केली होती.

यानंतर विराट भारताकडून आज जवळजवळ 26 वर्षांनंतर पर्थमध्ये शतकी खेळी करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

किंग कोहली बनला असा भीमपराक्रम करणारा पहिलाच आशियाई फलंदाज

कोहली आणि रहाणेच्या खेळीचे ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूंनी केले कौतुक

कर्णधार कोहलीने स्मिथचा तर विक्रम मोडलाच पण पॉटिंगचाही विक्रम आहे धोक्यात

रनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम

You might also like