-पराग कदम
नवयुवक क्रीडा मंडळ व कादवड क्रीडा मंडळ आयोजित रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली व समाजस्तरीय दुसरी कबड्डी प्रो लीग काळभैरव चषक दि १८ ते २० मे २०१८ रोजी मोठ्या दिमाखात पार पडल्या. अ गटातून विजेता ओम फायटर कादवड उपविजेता भवानी टायगर वावंढळ तर ब गटातून विजेता आरके ब्लास्टर्स दसपटी उपविजेता यश आयुष वेळे रायडर यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पहिल्या उपांत्य फेरीच्या सामना आर के ब्लास्टरस दसपटी विरुद्ध भवानी टायगर वावंढळ यांच्यात झाला यामध्ये ३२-१६ गुणांनी मात करत आरके ब्लास्टर्स दसपटी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामना यश आयुष वेळे विरुद्ध ओम फायटर कादवड यांच्यामध्ये झाला यामध्ये २४-१३ गुणांनी मात करत यश आयुष वेळे रायडर संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये आर के ब्लास्टरस दसपटी विरुद्ध यश आयुष वेळे रायडर या दोन्ही बलाढ्य संघामध्ये झाला यामध्ये १९ – १६ गुणांनी मात केली यामध्ये आरकेकडून आकाश कदम, वैभव कदम, अक्षय शिंदे च्या चढाया संकेत घडशी बहारदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावर संघ मालक अनंत कदम यांचा आर के ब्लास्टरस दसपटी अंतिम विजेते ठरला. तर यश आयुष वेळे रायडर कडून देवेन्द्र कदम, परेश चव्हाण, पवन मोरे, प्रथमेश झुझम यांची झुंज अपयशी ठरली.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता नवयुवक क्रीडा मंडळ व कादवड क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली या कबड्डी स्पर्धेचे मंत्रमुग्ध समालोचन श्री अमोलजी टाकळे व नितीन शिंदे या दोघांनी समर्थपणे पार पाडली.
अंतिम विजयी संघ
आर के ब्लास्टरस दसपटी
(२,००,०००/- दोन लाख रुपये)
अंतिम उपविजयी संघ
यश आयुष वेळे रायडर
(१,५१,०००/- एक लाख एक्कावन हजार रुपये)
उपांत्य उपविजयी संघ
ओम फायटर कादवड
(५१,०००/-एक्कावन हजार रुपये)
उपांत्य उपविजयी संघ
भवानी फायटर वावंढळ
(५१,०००/-एक्कावन हजार रुपये)
सर्वोत्तम खेळाडु
आकाश कदम
(१५,०००/- आर के ब्लास्टरस दसपटी)
सर्वोत्तम चढाई
देवेंद्र कदम
(१०,०००/- यश आयुष वेळ रायडर)
सर्वोत्तम क्षेत्ररक्षण
संकेत घडशी
(१०,०००/- आर के ब्लास्टरस दसपटी)
पहिल्या दिवसाचा मानकरी
प्रसाद शिंदे
(आर के ब्लास्टरस दसपटी)
दुसऱ्या दिवसाचा मानकरी
ओमकार कुंभार
(एम एन एस ब्लॅक पँथर)
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम