आज(31 डिसेंबर) आयसीसीने महिला क्रिकेटपटूंचे या वर्षीचे पुरस्कार जाहिर केले आहेत. यामध्ये भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्म्रीती मानधनाला 2018 या वर्षाचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रचल हेहो फ्लिंट पुरस्कार जाहिर झाला आहे. त्याचबरोबर तिला सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला आहे.
तिने 1 जानेवारी 2018 ते 31 जानेवारी 2018 या वर्षात 12 वनडे सामन्यात 66.90 च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. तसेच 25 टी20 सामन्यात 28.27 च्या सरासरीने 622 धावा केल्या आहेत.
विंडीजमध्ये पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत पोहचवण्यात तिने मोलाची भूमीका पार पाडली होती. तिने या स्पर्धेत 5 सामन्यात 178 धावा केल्या होत्या. ती सध्या आयसीसी महिला वनडे क्रमवारीत 4थ्या तर टी20 क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे.
मानधना ही आयसीसीची वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरणारी दुसरीच भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. तिच्याआधी झुलन गोस्वामीला हा पुरस्कार 2007 मध्ये मिळाला होता.
हे पुरस्कार जाहिर झाल्यानंतर मानधना म्हणाली, ‘पुरस्कार मिळणे हे आनंद देणारे आहे. कारण खेळाडू म्हणून तूम्ही जेव्हा धावा करता तेव्हा तूम्हाला तूमचा संघ जिंकावा असे वाटते. त्यानंतर जेव्हा तूमच्या कामगिरीची असा पुरस्कार देऊन दखल घेतली जाते तेव्हा यातून आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.’
या एका वर्षातील कामगिरीबद्दल मानधना म्हणाली, ‘मी दक्षिण आफ्रिकेमध्ये शतक केल्यानंतर मी काहीशी समाधानी होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकाही चांगल्या होत्या. अनेक लोक म्हणायचे की मी भारतात जास्त धावा करत नाही. पण मी इथेही स्वत:ला सिद्ध केले. त्याचमुळे मी आत्ता खेळाडू म्हणून तयार झाली आहे. यानंतर टी20 विश्वचषकातील पहिले चार सामने अविस्मरणीय होते. ‘
मानधना बरोबरच ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलीला 2018 या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी20 महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळला आहे. तर इंग्लंडची क्रिकेटपटू सोफी एक्लेस्टोनला आयसीसी महिला एमर्जिंग क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे.
2018 या वर्षीतील आयसीसी पुरस्कार विजेत्या महिला क्रिकेटपटू –
आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठीची रचल हेहो फ्लिंट पुरस्कार – स्म्रीती मानधना (भारत)
आयसीसीची सर्वोत्कृष्ट वनडे महिला क्रिकेटपटू – स्म्रीती मानधना (भारत)
आयसीसीची सर्वोत्कृष्ट टी20 महिला क्रिकेटपटू – एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया)
आयसीसीची महिला एमर्जिंग क्रिकेटपटू – सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
India's star batter Smriti Mandhana bags Rachael Heyhoe-Flint Award and Women's ODI Player of Year 2018! 👏
READ 👇https://t.co/7TLSe2pblG pic.twitter.com/h0GtsKKsYG
— ICC (@ICC) December 31, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–मेलबर्न कसोटीतील विजयामुळे टीम इंडियाला झाला मोठा फायदा
-‘बाप’माणूस रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर