इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) या संघाची गणना होते. आतापर्यंत सीएसकेने ३ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार एमएस धोनीने सुरुवातीपासूनच सीएसकेच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळली आहे. शिवाय, सीएसकेच्या सामन्यावेळी चाहतेदेखील या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देत सामन्याचा आनंद लुटताना दिसतात.
गेल्या एक दशकात सीएसके संघाकडून अनेक खेळाडूंनी क्रिकेट खेळले आहे. दरम्यान काही खेळाडू यशाच्या शिखरावर पोहोचले. तर, काही खेळाडूंना यशाचा स्वादही चाखायला मिळाला नाही. तसेच, बऱ्याचदा असेही पाहायला मिळते की, दिग्गज खेळाडू मोठ्या टूर्नामेंटमध्ये किंवा मोठ्या संघाशी जुळल्यानंतर अपेक्षित कामगिरी करण्यात अयशस्वी ठरतात. सीएसके संघातील काही दिग्गज खेळाडूंसोबतही असेच घडले आहे.
या लेखात सीएसके संघातील अशाच ३ खेळाडूंवर आपण चर्चा करणार आहोत, ज्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे नाव होते. परंतु, सीएसके संघात प्रवेश केल्यानंतर हवे तेवढे यश त्यांच्या हाती आले नाही.
चेन्नई सुपर किंग्स संघातील ३ फ्लॉप दिग्गज खेळाडू –
सॅम्युअल बद्री –
वेस्ट इंडिज संघातील फिरकीपटू गोलंदाज सॅम्युअल बद्री २०१४मध्ये सीएसके संघाचा भाग होता. संपूर्ण हंगामात त्याने फक्त ४ सामने खेळले. दरम्यान त्याने फक्त २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. आयपीएलच्या सातव्या हंगामापुर्वी बद्रीने टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिजकडून ५ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु, सीएसके संघाकडून खेळताना त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.
अँड्रू फ्लिंटॉफ –
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रू फ्लिंटॉफला २००९मध्ये सीएसके संघात सामाविष्ट करण्यात आले होते. त्यावेळी क्रिकेटविश्वात फ्लिंटॉफचे मोठे नाव होते. आयपीएलच्या दूसऱ्या हंगामात फ्लिंटॉफने सीएसकेकडून ३ सामने खेळले. दरम्यान त्याने फक्त ६२ धावा केल्या आणि २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याला सीएसकेकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
थिसारा परेरा –
श्रीलंकाचा क्रिकेटपटू थिसारा परेराने २०१० साली सीएसकेकडून फक्त एक सामना खेळला होता. त्यातही त्याने १ षटकात १९ धावा दिल्या होत्या आणि एकही विकेट घेतली नव्हती. असे असले तरी, त्याच्या या एका सामन्यातील प्रदर्शनावरुन त्याचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही. परंतु, सीएसकेनंतर परेरा ५ वेगवेगळ्या संघाकडून खेळला. तरीही त्याला प्रभावशाली प्रदर्शन करता आले नाही.
ट्रेंडिंग लेख –
या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…
आयपीएल २०२० मध्ये हे ५ मोठे विक्रम मोडण्याची शक्यता…
आयपीएल २०२० – प्रत्येक संघाकडे असणारा एक परदेशी खेळाडू जो एकहाती बदलू शकतो सामन्याचा निकाल…