fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकहाती सामना बदलायची ताकद ठेवणारा प्रत्येक संघाचा दमदार परदेशी खेळाडू

IPL 2020 - A foreign Player Each Team Has, Who Can Change The Outcome Of The Match...

September 8, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएल २०२० सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात काही परदेशी खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. प्रत्येक संघांचे मालक त्यांची निवड करताना बराच विचार करतात. कारण त्यापैकी एकाही खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी बजावली तर तो विजय आणि पराभव यातील एक दुवा असू शकतो.

आयपीएलच्या मागील मोसमात बर्‍याच खेळाडूंनी आपल्या स्फोटक फटकेबाजीने व प्रभावी गोलंदाजीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बरेच विदेशी खेळाडू त्यांच्या संघासाठी मोठी भूमिका निभावतील.

लेखात आपण अशाच परदेशी खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे यंदाच्या आयपीएलमध्ये एकहाती संघाला विजयी करू शकतात.

८. रशीद खान – सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादचा लेगस्पिनर राशिद खान हा त्याच्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावेल. २०१७ मध्ये आयपीएल पदार्पण केल्यापासून राशिद खान सनरायझर्स हैदराबादसाठी स्टार परफॉर्मर आहे आणि त्याने स्वत: हून संघाला बरेच सामने जिंकून दिले आहेत.

आपल्या गोलंदाजीबरोबरच राशिद खानने आपल्या फलंदाजीवरही काम केले आहे. ज्यामुळे तो आपल्या संघासाठी वेगवान खेळी करू शकतो. म्हणूनच या संघासाठी रशीद इतका महत्त्वपूर्ण आहे. यावर्षीही राशिदकडून संघाला बर्‍याच अपेक्षा आहेत. या खेळाडूचे क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी ही उत्तम आहे.

७. शेन वॉटसन – चेन्नई सुपर किंग्ज

शेन वॉटसन आयपीएलमध्ये २०१८ पासून चेन्नई संघातून खेळताना दिसतो. चेन्नई सुपर किंग्जच्या २०१८ मधील विजयात त्याचे मोलाचे योगदान होते. त्याचप्रमाणे २०१९ च्या अंतिम सामन्यातील त्याची खेळी प्रेक्षनकांना आजही आठवत असेल. दुखापतग्रस्त असतानाही त्याने शतकीय खेळी करून सर्वांची मने जिंकली होती. परंतु, तो संघाला अंतिम सामना जिंकून देऊ शकला नाही. २०१९ मध्ये शेन वॉटसनने १७ आयपीएल सामने खेळले जेथे त्याने २३.४१ च्या सरासरीने ३९८ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने १ शतकही केले.

इतकेच नाही तर तो अष्टपैलू खेळाडू असल्याने तो त्याच्या संघात महत्त्वपूर्ण स्थान आहे. यंदाही त्याच्याकडून असाच खेळाची अपेक्षा असेल. म्हणून वॉटसन संघासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.

६. शिमरोन हेटमायर- दिल्ली कॅपिटल्स

गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाला सर्वात कमी जाणवली ती फिनिशरची, त्यामुळे यावर्षी आयपीएलच्या लिलावात दिल्ली कॅपिटल संघाने शिमरोन हेटमायर आणि अ‍ॅलेक्स कॅरीसारख्या खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट केले.

वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज हेटमायर हा संघाचा फिनिशर म्हणून खेळतो आणि तो दिल्ली कॅपिटल्स संघासाठीही तो असे करू शकतो. यंदाच्या आयपीएल लिलावात ७.७५ कोटी रुपये देऊन दिल्ली कॅपिटलने त्याचा संघात समावेश केला आहे. दिल्लीला अशा खेळाडूची गरज आहे जो कोणत्याही क्रमांकावर स्फोटक डाव खेळू शकेल आणि हेटमायर तसे करण्यास माहिर आहे आणि अशा परिस्थितीत तो अंतिम अकरामध्ये असणे जवळपास निश्चित आहे. हेटमायर संघाची एक बाजू भक्कम करण्यास सक्षम आहे.

५. आंद्रे रसेल – कोलकाता नाईट रायडर्स

वेस्ट इंडीजचा तुफानी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये जोरदार फलंदाजी करताना दिसतो. आयपीएल २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या वतीने आंद्रे रसेलच्या कामगिरीने सर्व संघांना घाम फुटला होता. या खेळाडूने संघाला पाच सामने एकहाती जिंकून दिले. रसेलने आयपीएल २०१९ च्या १४ सामन्यांमध्ये २०४.८१ च्या स्ट्राइक रेटने एकूण ५१० धावा केल्या. तसेच केकेआरमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज होता.

एवढेच नव्हे तर मागील सत्रात रसेल सर्वाधिक षटकार (५२) मारणारा फलंदाज होता. रसेलने आयपीएल २०२० मध्येही अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. तो संघातील सर्वोत्तम मॅच विनर खेळाडू आहे.

४. जोस बटलर – राजस्थान रॉयल

इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी जगभरात ओळखला जातो. सन २०१९ मध्ये राजस्थानकडून खेळताना त्याची काही स्फोटक खेळीही पाहायला मिळाली. बटलरने राजस्थानकडून २०१९ मध्ये ८ सामन्यांत १५१ च्या स्ट्राईक रेटसह ३११ धावा केल्या. आयपीएलच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत बटलरने ४५ सामन्यांत १३८६ धावा केल्या आहेत. यावर्षी बटलर आयपीएल संपूर्ण खेळाला तर तो संघातील महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध होईल.

बटलर त्याच्या आक्रमक खेळण्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. तो पुन्हा एकदा आपल्या संघाला आयपीएल २०२० मध्ये शानदार सुरुवात करून देताना दिसू शकतो. बटलर हा देखील असा खेळाडू आहे जो एकट्याने संघाला जिंकवू शकतो.

३. ग्लेन मॅक्सवेल – किंग्ज इलेव्हन पंजाब

ग्लेन मॅक्सवेल एक ऑस्ट्रेलियन स्फोटक अष्टपैलू खेळाडू आहे. टी-२० क्रिकेट हे मॅक्सवेलचे आवडते स्वरूप आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३ शतकेही केली आहेत. मॅक्सवेलला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. त्याने आयपीएलमधील ६९ सामन्यात १६१.१३ च्या स्ट्राईक रेटने एकूण १३९७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १६ विकेट्सही आहेत. मॅक्सवेलचा युएईमध्ये जबरदस्त रेकॉर्ड आहे.

आयपीएल २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत त्याने ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ची ट्रॉफी जिंकली आहे. अशा परिस्थितीत हा स्फोटक खेळाडू एकट्याने आपल्या संघाला विजयी करण्यात सक्षम आहे.

२. कायरन पोलार्ड – मुंबई इंडियन्स

२०१० मध्ये मुंबई इंडियन्स संघात सहभागी झालेल्या कायरन पोलार्डने सातत्याने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच संघाने त्याला एकदाही संघातून बाहेर जाऊ दिले नाही. पोलार्डच्या जबरदस्त षटकारांनी चाहत्यांची मने जिंकली. अष्टपैलू पोलार्डने मुंबईकडून आतापर्यंत १४८ सामने खेळले आहेत आणि २८.६९ च्या सरासरीने २७५५ धावा केल्या आहेत. पोलार्ड नेहमीच संघाचा एक महत्वाचा भाग राहिला आहे.

गोलंदाजी करताना पोलार्डने ८.८५ च्या इकॉनमी रेटने मुंबईकडून ५६ विकेट्स घेतल्या आहेत आणि क्षेत्ररक्षणातील त्याची कामगिरीही उत्कृष्ट आहे. या खेळाडूने अनेक वेळा मुंबई इंडियन्सला स्वतःच्या जोरावर सामना जिंकून दिला आहे.

१. एबी डिव्हिलियर्स – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

एबी डिव्हिलियर्स हा २०११ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य झाला आणि तेव्हापासून हा दिग्गज खेळाडू आरसीबी संघाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रत्येक आयपीएलमधील त्याची खेळी उत्कृष्ट आहे.

एबी डिव्हिलियर्सची फलंदाजी उत्तम आहे. त्याची ३६० स्टाइलची फलंदाजी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरते. चेंडू कसाही असो, हा फलंदाज त्याला मैदानाच्या बाहेर पोहोचवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. म्हणून एबी डिव्हिलियर्स देखील असा फलंदाज आहे जो एकहाती संघाला जिंकवू शकतो. आरसीबीसाठी त्याने असे बर्‍याच वेळा सामने जिंकून दिले आहेत.

ट्रेंडिंग लेख –

क्रिकेटमधील ३ अशा घटना, जेव्हा सौरव गांगुलीने केली ‘दादागिरी’

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ६: ब्रेंडन मॅक्यूलमने भारताविरुद्ध केलेले झकास त्रिशतक

यशाच्या शिखरावर असताना निवृत्त झालेले तीन यष्टीरक्षक फलंदाज

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नई सुपरकिंग्स पुढचा कर्णधार कोण होणार? अष्टपैलू खेळाडूंनी केला खुलासा

पाकिस्तान संघाची वार्षिक कमाई “हिट मॅन” च्या IPL कमाईच्या आहे अर्धी

धोनीच्या नेतृत्वाचा डीजे ब्राव्हो झाला फॅन, म्हणाला सीएसके माझे…


Previous Post

सामना फिक्सिंग प्रकरणात दोषी, प्रशिक्षकावर ५ वर्षाची बंदी

Next Post

आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी

April 11, 2021
Next Post

आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य

वडिलांबरोबर वेळ घालविण्यासाठी आयपीएलचा सर्वात मोठा स्टार काही सामन्यातून बाहेर

जर तेव्हा टी-२० क्रिकेट असते तर, हे ५ दिग्गज खेळाडू ठरले असते हिरो

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.