---Advertisement---

पाकिस्तान संघाची वार्षिक कमाई “हिट मॅन” च्या IPL कमाईच्या आहे अर्धी

On: सोमवार, सप्टेंबर 7, 2020 8:34 PM
---Advertisement---

दहशतवादामुळे जागतिक क्रिकेटमध्ये अतिशय खराब अवस्था झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.  भारतीय क्रिकेट बोर्डाने या देशाबरोबरील सर्व प्रकारचे क्रिकेट कधीच बंद केले आहे. याचा मोठा परिणाम पीसीबीच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे.

याचाच परिणाम म्हणजे आता पाकिस्तानी क्रिकेट संघाची पगाराची परिस्थिती अशी झाली आहे की संपूर्ण संघाचा पगार एकत्र केला तरी भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या पैशाची बरोबरी होऊ शकत नाही. आश्चर्याची बाब अशी की भारतीय दिग्गज फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) एका वर्षामध्ये IPL मधून मिळालेली कमाईमधील अर्धा पगार देखील पाकिस्तानी खेळाडूंना त्याच्या बोर्डाकडून मिळत नाही.

पाक क्रिकेटपटूंना केंद्रीय कराराप्रमाणे पीसीबीकडून संपूर्ण वर्षभराचे १० लाख डॉलर्स एवढी रक्कम मिळते तर रोहितला आयपीएल करारामधून २१ लाख डॉलर्स एवढी राक्कम मिळते.

१. पाक संघाला मिळतो अशाप्रकारे पगार
पीसीबीने मे महिन्यात १८ खेळाडूंची वार्षिक कराराची यादी जाहीर केली. या यादीमध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam), अझर अली (Azhar Ali) आणि शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) यांना ग्रेड-ए मध्ये स्थान देण्यात आले असून या तिघांचा प्रत्येकी ८१,५७६ डॉलर वार्षिक पगार आहे.

तसेच, ग्रेड-बी मध्ये असलेल्या ९ पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी ५५,६२७ डॉलर आणि ग्रेड-सी मधील ६ क्रिकेटपटूंसाठी ४०,७९३ डॉलर पगार देण्याचे निश्चित आहे. त्यानुसार या सर्व क्रिकेटर्सचे वार्षिक उत्पन्न सुमारे १० लाख डॉलर्स एवढे आहे.

२. IPL मधील रोहित शर्माचे उत्पन्न
रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघातून खेळत आहे. तसेच तो या संघाचा कर्णधार आहे आणि आतापर्यंत मुंबईने आय़पीएल व चँम्पियन्स लीगची मिळून ६ वेळा हे विजेतेपदं जिंकली आहे. सध्याच्या हंगामात मुंबई इंडियन्सने रोहितला सुमारे २१ लाख डॉलर्स देऊन संघात घेतले आहे, जे पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या एकत्रित वार्षिक उत्पन्नापेक्षा सुमारे ११ लाख डॉलर्स जास्त आहे.

३. टीम इंडियामध्ये विराटनंतर रोहित सर्वात श्रीमंत खेळाडू
नेट वर्थच्याच्या बाबतीत रोहित शर्मा हा सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नंतर टीम इंडियाचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. जरी एमएस धोनी (MS Dhoni) यांच्या पेक्षा श्रीमंत असला, तरी टीम इंडियाशी त्याचा सध्या कोणताही करार नाही. रोहितची सध्याची कमाई सुमारे १२४ कोटी रुपये आहे, तर मागील वर्षात विराटची कमाई १९६ कोटींची होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---