२० षटकांच्या इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) सहसा फलंदाजांची टूर्नामेंट म्हटले जाते. कारण, मोठमोठे फलंदाज त्यांच्या शानदार फटकेबाजीने दर्शकांचे मनोरंजन करताना दिसतात. पण, याबाबतीत आयपीएलमधील गोलंदाजही मागे पडले नाहीत. अनेकदा आपल्या गोलंदाजीचे दमदार प्रदर्शन करत, गोलंदाजही दर्शकांना आपल्या प्रेमात पाडताना दिसतात.
तसं तर, आयपीएलच्या इतिहासात एकापेक्षा एक तगडे गोलंदाज होऊन गेले आहेत आणि आजही आहेत. यामध्ये परदेशी गोलंदाजांसह भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. तस पाहिलं तर, वेगवान आणि फिरकी गोलंदाजी या दोन्ही प्रकारातील गोलंदाज आयपीएलच्या प्रत्येक हंगामात जोरदार कामगिरी करताना दिसतात. पण, संयुक्त अरब अमिराती (युएई)मधील मैदाने फिरकीपटूंसाठी जास्त सोईस्कर आहेत. त्यामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामात वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाज जास्त चांगले प्रदर्शन करताना दिसू शकतात.
या लेखात, युएईच्या मैदानावर गोलंदाजी करताना पूर्ण हंगामात एकदा तरी एका सामन्यात ५ विकेट्स घेऊ शकणाऱ्या (५ विकेट्स हॉल) ३ भारतीय गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात केवळ २ असे गोलंदाज आहेत, ज्यांनी २ वेळा ५ विकेट्स हॉल घेण्याचा कारनामा केला आहे. तर, १६ गोलंदाजांनी प्रत्येकी १वेळा हा पराक्रम केला आहे.
तीन भारतीय गोलंदाज, जे या हंगामात करु शकतात ५ विकेट्स हॉल घेण्याचा कारनामा (3 Indian Bowlers Who Might Take 5 Wickets In IPL 2020) –
१. युजवेंद्र चहल –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दमदार फिरकीपटू युजवेंद्र चहल या आयपीएल हंगामात संघासाठी दमदार प्रदर्शन करु शकतो. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये २वेळा एका सामन्यात ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. मात्र, त्याला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या एका सामन्यात ५ विकेट्स घेण्यााच पराक्रम करता आला नाही. पण, युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी सोईची आहेत. त्यामुळे तो कदाचित या हंगामात हा विक्रम नोंदवू शकतो.
चहलने त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत ८४ सामने खेळत १०० विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
२. कुलदीप यादव –
भारताचा चायनामॅन कुलदीप यादव याने वेळेनुसार आपल्या गोलंदाजी प्रदर्शनात सुधार केले आहेत. युएईच्या मोठ्या मैदानांवर त्याच्या सपाट (फ्लाइटेड) चेंडूंचा सामना करताना फलंदाज त्यांच्या विकेट्स गमावू शकतात. त्यामुळे हा गोलंदाज यंदा आयपीएलच्या एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.
यादवने यापुर्वी एकवेळा ४ विकेट्स हॉल घेण्याचा कारनामा केला आहे. पण त्याला अजून तरी ५ विकेट्स हॉल घेण्याचा पराक्रम करता आलेला नाही. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४० सामने खेळले आहेत दरम्यान त्याने ३९ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
३. जसप्रीत बुमराह –
गेल्या ७ हंगामांपासून रोहितच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सचा भाग असणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील यंदा हा विक्रम आपल्या नावावर करु शकतो. त्याची आतापर्यंतची आयपीएल कारकिर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्याने मुंबईकडून ७७ सामने खेळत ८२ विकेट्स चटकावल्या आहेत.
२०१६साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याच्या गोलंदाजी प्रदर्शनात जास्त प्रगती झाली आहे. जरी, युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी जास्त लकी ठरणारी असली, तरी हा वेगवान गोलंदाज या मैदानांवरही आपली कामगिरी दाखवण्यात मागे पडणार नाही.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स
आयपीएल २०२० मधून वेगवेगळ्या कारणाने माघार घेणाऱ्या खेळाडूंची संपुर्ण यादी
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, आबुधाबीत या सामन्याने होणार स्पर्धेला सुरुवात
चेन्नईला आयपीएल जिंकून देणारा क्रिकेटर म्हणतोय, ‘ही’ गोष्ट खूपच भारी आहे
असा टी२० क्रिकेटर होणे नाही, इंग्लंडच्या दिग्गजाची ‘त्या’ खेळाडूवर स्तुतीसुमने