आयपीएल २०२०: असे आहे चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण वेळापत्रक

येत्या 29 मार्चपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या(आयपीएल) 13 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसातील साखळी सामन्यांचे वेळापत्रक शनिवारी(15 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. या मोसमातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात मुंबई येथे पार पडणार आहे.

आयपीएलचा हा 13 वा मोसम यावर्षी 50 दिवसांचा असणार आहे. 29 मार्च ते 17 मे पर्यंत या आयपीएल मोसमातील साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.

तसेच यावर्षी आयपीएलमध्ये केवळ रविवारीच डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने 4 वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने 8 वाजता सुरु होतील.

आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने आत्तापर्यंत आयपीएलचे 3 वेळा विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे यावर्षी चेन्नईचा संघ चौथे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळेल. चेन्नईचे यावर्षीचे घरचे सर्व सामने चेन्नईला एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. चेन्नईच्या 14 सामन्यांपैकी 13 सामने रात्री 8 वाजता होतील. तर 10 मे ला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणारा सामना दुपारी 4 वाजता होईल.

असे आहेत आयपीएल 2020 मधील चेन्नई सुपर किंग्सचे साखळी फेरीतील सामने – 

29 मार्च, रविवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मुंबई, रात्री 8 वाजता

2 एप्रिल, गुरुवार: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – चेन्नई, रात्री 8 वाजता

6 एप्रिल, सोमवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – कोलकाता, रात्री 8 वाजता

11 एप्रिल, शनिवार: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – चेन्नई, रात्री 8 वाजता

13 एप्रिल, सोमवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – दिल्ली, रात्री 8 वाजता

17 एप्रिल, शुक्रवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मोहाली, रात्री 8 वाजता

19 एप्रिल, रविवारः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – चेन्नई, रात्री 8 वाजता

24 एप्रिल, शुक्रवार: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – चेन्नई,रात्री 8 वाजता

27 एप्रिल, सोमवारः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – चेन्नई, रात्री 8 वाजता

30 एप्रिल, गुरुवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

4 मे , सोमवारः राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – जयपुर, रात्री 8 वाजता

7 मे, गुरुवार: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – चेन्नई, रात्री 8 वाजता

10 मे, रविवारः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – चेन्नई, दुपारी 4 वाजता

14 मे, गुरुवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – बेंगळुरू, रात्री 8 वाजता

You might also like