आयपीएल २०२० ही स्पर्धा येत्या १९ सप्टेंबर रोजी यूएईच्या मैदानावर खेळली जाईल. ही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच संघ तयारीत आहेत. प्रत्येक खेळाडूचीही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याची इच्छा आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये काहीतरी नवीन आणि वेगळं असण्याचीही प्रेक्षकांची अपेक्षा असते.
आयपीएलमध्ये असे काही संघ आहेत ज्यांना एकदाही जेतेपद जिंकण्याची संधी मिळाली नाही. दिल्लीची कॅपिटल, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांना आयपीएलमध्ये विजेतेपद जिंकण्याची संधी मिळाली नाही.
दिल्ली कॅपिटलच्या संघात यावेळी सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे. संघातील या दमदार खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर संघ विरोधी संघाला मोठे आव्हान देऊ शकतो. या संघात असणाऱ्या खेळाडूंकडे सामना एकहाती फिरविण्याची क्षमता आहे. या लेखात दिल्ली कॅपिटलच्या अशा तीन खेळाडूंबद्दल चर्चा करूया, जे आयपीएलमध्ये त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात.
दिल्ली कॅपिटल संघामधील ३ खेळाडू आयपीएल जिंकून देऊ शकतात
कागिसो रबाडा (Kagiso Rabada)
दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजामध्ये प्रचंड क्षमता आहे. मागील हंगामातही कागिसो रबाडाने दिल्ली कॅपिटलसाठी जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने १२ सामन्यात २५ बळी घेतले होते. तर त्याने खेळलेल्या एकूण १८ आयपीएल सामन्यात ३१ गडी बाद केले आहेत.
अंतिम षटकात कमी धावा देऊन संघाच्या विजयाची शक्यता वाढविण्यातही कागिसो रबाडा प्रभावी ठरू शकतो. क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असणारा हा गोलंदाज यावेळी दिल्ली संघाला विजयी होण्यास महत्वाची भूमिका बजावू शकतो.
मार्कस स्टोईनिस (Marcus Stoinis)
या ऑस्ट्रेलियन खेळाडूने बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही कामगिरीतून तो संघाला विजय मिळवून देऊ शकतो. टी-२० क्रिकेटमधील त्याचा अनुभव दिल्ली कॅपिटलसाठी उपयुक्त ठरू शकतो. हा खेळाडू एखाद्या कठीण परिस्थितीत संघाची जबाबदारी स्वीकारून महत्वाची भूमिका बजावू शकतो. आधी तो आरसीबीकडून खेळत होता.
त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळले असून ४७३ धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत १५ बळी मिळवले आहेत.
रिषभ पंत (Rishabh Pant)
रिषभ पंत हा दिल्ली कॅपिटल संघातील सर्वात घातक खेळाडू आहे. रिषभ पंतने अनेक वेळा दिल्लीसाठी उपयुक्त अशी फलंदाजी केली आहे. सामना एकहाती फिरवण्याची क्षमता एकट्या रीषभ पंतमध्ये आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५४ सामन्यात १७३६ धावा केल्या आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १२८ धावा आहे. यावरूनच त्याची भूमिका यंदा दिल्ली कॅपिटल संघासाठी नक्कीच महत्वाची ठरणार आहे.
ट्रेंडिंग लेख –
जर तेव्हा टी-२० क्रिकेट असते तर, हे ५ दिग्गज खेळाडू ठरले असते हिरो
आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
असे ३ प्रसंग; जेव्हा एखाद्या क्रिकेटरची दुखापत ठरते दुसऱ्याच खेळाडूसाठी वरदान
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटीत त्रिशतक ठोकलेला खेळाडू म्हणतो, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरच मला…
आयपीएल २०२० बाबत विराट कोहली म्हणतो, मला २०१६ सारखं…
त्याला फटकेबाजी करताना रोखणे केवळ अशक्य, आम्हाला प्लॅनच बदलावा लागणार