५ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु झालेली ३ सामन्यांची कसोटी मालिका काल (२५ ऑगस्ट) संपली. या मालिकेत इंग्लंडने १-० ने विजय मिळवला.
काल या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे खूप उशीरा चालू झाला. पण, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कामगिरीने या दिवसाला अविस्मरणीय बनवले. साउथॅम्पटन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यातील पाकिस्तानच्या दूसऱ्या डावात अँडरसनने जबरदस्त गोलंदाजी करत पाकिस्तानचा कर्णधार अजहर अलीला बाद केले. त्याच्या या विकेटमुळे त्याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. तो विक्रम म्हणजे, कसोटी कारकिर्दीत ६०० विकेट्स घेण्याचा विक्रम.
अँडरसनने त्यांच्या कसोटीतील ६०० विकेट्स पूर्ण करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तर कसोटी इतिहासातील काही जुने विक्रम मोडण्यात त्याला अपयशही आले आहे. तर जाणून, अँडरसनच्या ६०० कसोटी विकेट्सशी जुळलेल्या ५ मोठ्या गोष्टी (5 Records Related To James Anderson 600 Test Wickets) –
१. केवळ ६ चेंडूंनी हुकला विश्वविक्रम
अँडरसनने ३३७१७ चेंडू टाकत त्यांच्या कसोटीतील ६०० विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सर्वात कमी चेंडूत ६०० विकेट्स घेणारा तो जगातील दूसरा गोलंदाज बनला आहे. त्यापुर्वी श्रीलंकाचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने ३३७११ चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ६०० विकेट्स घेतल्या होत्या आणि सर्वात कमी चेंडूत ६०० कसोटी विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता.
अशाप्रकारे केवळ ६ चेंडूमुळे म्हणजेच फक्त ०.०१७ टक्क्यांनी अँडरसनला मुरलीधरनचा विश्वविक्रम मोडण्यात अपयश आले आहे. मुरलीधरन आणि अँडरसननंतर हा विक्रम करणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत शेन वॉर्न तिसऱ्या (३४९१९ चेंडू) आणि अनिल कुंबळे चौथ्या (३८४९६ चेंडू) क्रमांकावर आहे.
२. ६०० कसोटी विकेट्स घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज
कसोटीत क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स घेणारा अँडरसन हा जगातील पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांपैकी सर्वात जलद १०० विकेट्स घेण्याचा विक्रम चार्ली टर्नर, २०० विकेट्स घेण्याचा विक्रम ऍलेक बेडसर, ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम फ्रेड ट्रूमैन, ४०० विकेट्स घेण्याचा विक्रम रिचर्ड हेडली आणि ५०० विकेट्स घेण्याचा विक्रम कर्टनी वॉल्श या वेगवान गोलंदाजांनी केला होता. पण, अँडरसनने या सर्वांच्या एक पाऊल पुढे टाकत, कसोटीतील सर्वात जलद ६०० विकेट्स घेतल्या आहेत.
३. सर्वात जलद ४००, ५०० आणि ६०० विकेट्स घेणारा गोलंदाज
अँडरसन हा सर्वात जलद ४००, ५०० आणि ६०० कसोटी विकेट्स घेणारा इंग्लंडचा गोलंदाज आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड कसोटी क्रिकेटमधील आपल्या ५१४ विकेट्ससह अँडरसनच्या मागे आहे. ३४ वर्षीय ब्रॉड भविष्यात अँडरसनच्या सर्वात जलद ६०० विकेट्स घेण्याच्या विक्रमाला मागे टाकण्याची शक्यता आहे.
४. अँडसरनच्या कसोटीतील महत्त्वाच्या विकेट्स
२००३ साली झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण करणाऱ्या अँडरसनने पहिली विकेट झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू मार्क वर्मयूलन याची घोतली होती. तर, १००वी विकेट जॅक कॅलिस, २००वी विकेट पीटर सिडल, ३००वी विकेट पीटर फुल्टन, ४००वी विकेट मार्टिन गप्टिल आणि ५००वी विकेट क्रेग ब्रेथवेटची घेतली होती. आता त्याचा ६००वा शिकार अजहर अली बनला आहे.
५. वाढत्या वयानुसार विकेट्स घेण्याची क्षमताही वाढली
विशेष म्हणजे, अँडरसनचे वय जसजसे वाढत आहे, तसतशी त्याची विकेट्स घेण्याची क्षमताही वाढत चालली आहे. २१व्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात करणाऱ्या अँडरसनने वयाची ३० वर्षे पूर्ण होईपर्यंत २३.८७च्या सरासरीने ३२२ विकेट्स चटकावल्या होत्या. तर, ३०व्या वर्षापासून ते ३५व्या वर्षापर्यंत त्याने २१.०६च्या सरासरीने १२० विकेट्स चटकावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन आला पुढे
आश्चर्यकारक! खेळपट्टीमध्ये दबला चेंडू, सामन्याला झाला उशीर
जोफ्रा आर्चरने सहा वर्षांपूर्वी केलेले ट्विट होतेय व्हायरल, रिया संबधी केले होते भाष्य
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: अशी ४ कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मिळू शकते ५ वे आयपीएल विजेतेपद
असे ३ खेळाडू ज्यांनी केली आहे १० स्थानांवर फलंदाजी
‘या’ ५ क्रिकेटर्सच्या नावाची गंमतच वेगळी, मोठ्या शहरांची आणि यांची नावं आहेत सारखी