---Advertisement---

त्याचं नशीबचं इतकं खराब होतं की सचिनबरोबर पदार्पण केलं, पण खेळला एकच कसोटी सामना

On: मंगळवार, मार्च 1, 2022 3:44 PM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जेव्हा कसोटी पदार्पण केले होते, त्याच सामन्यात आणखी एका खेळाडूने भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. परंतु, पदार्पणानंतर सचिनने तब्बल २०० कसोटी सामने खेळले, तर या खेळाडूला एकच कसोटी सामना खेळता आला. या खेळाडूचे नाव सलील अंकोला. आज(१ मार्च) त्याचा ५३ वा वाढदिवस आहे आहे.

त्याने १५ नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केले होते. त्याने या सामन्यात ६ धावा केल्या होत्या आणि २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच सलिलने भारताकडून २० वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने ४७.३० च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकातही समावेश होता. त्यानंतर त्याने १९९७ मध्ये २८ वर्षांचा असतानाच अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

यानंतर त्याने टीव्ही मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याची ‘शss कोई हैं’ तसेच ‘विक्राल और गब्राल’ मधील विक्रालची भूमीका चांगली गाजली होती. तसेच त्याने काही चित्रपटातही काम केले. यात कुरुक्षेत्र, पिताह, चुरा लिया हैं तुमने, अशा काही चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या.

सलिलने जरी क्रिकेट सोडले असले तरी क्रिकेटशी असलेली नाळ त्याला सोडता आली नाही. तो सध्या सलिल मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समीतीचा अध्यक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

संघ सहकाऱ्याच्या मदतीला धावला अझर; उचलणार किडनी शस्त्रक्रियेनंतरचा खर्च

मोहालीलाही विराटच्या शतकाची प्रतिक्षा, सेंच्यूरीसह करू शकतो आजवर कोणत्याही भारतीयाने न केलेला विक्रम

अफगानिस्तानने टाळला क्लीन स्वीप! अखेरच्या वनडेत केली बांगलादेशवर मात; राशिद-गुरुबाज चमकले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---