इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने सलग दुसर्या वर्षी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मुंबईचा संघ प्रथमच सलग दोन अंतिम सामने खेळणार आहे. त्यांच्यासमोर, दिल्ली कॅपिटलचा संघ प्रथमच अंतिम सामन्यासाठी पोहोचला आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सर्वाधिक अंतिम सामने गाठण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. दुसर्या क्रमांकावर मुंबई, तर दिल्लीचे नाव सर्वात शेवटी आहे.
आयपीएलचा हा 13 वा हंगाम आहे. आतापर्यंत 6 संघांनी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यापैकी डेक्कन चार्जर्सचा संघ आता या स्पर्धेचा भाग नाही. मुंबईने सर्वाधिक चार वेळा, तर चेन्नईने तीन वेळा विजय मिळविला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा हा किताब जिंकण्याचे पराक्रम केले आहेत.
राजस्थान रॉयल्स संघ हा विजेतेपद मिळविणारा पहिला संघ ठरला. परंतु त्यानंतर त्यांचा संघ कधीही ट्रॉफी जिंकू शकला नाही, तर सनरायझर्स हैदराबादनेही एकदा विजय मिळवला आहे.
चेन्नईने खेळले सर्वाधिक अंतिम सामने
आयपीएलचे सर्वाधिक अंतिम सामने खेळण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. 2009, 2014, 2016, 2017 आणि 2020 मधील अंतिम सामने सोडले, तर स्पर्धेतील सर्व अंतिम सामने चेन्नईने खेळले आहेत. 2009 व 2014 मध्ये ते अंतिम सामन्यात पोहोचू शकले नव्हते. 2016 आणि 2017 मध्ये चेन्नईच्या संघाला निलंबित करण्यात आले होते, तर यावर्षी 2020 मध्ये ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले.
सर्वाधिक अंतिम सामना खेळणारा मुंबई दुसरा संघ
चेन्नईनंतर मुंबईचे नाव सर्वाधिक आयपीएल अंतिम सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत येते. यावर्षी सहाव्यांदा संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यापूर्वी 2010, 2013, 2015, 2017, 2019 मध्ये मुंबईने अंतिम सामना खेळला. 2010 मध्ये मुंबईचा संघ पराभूत झाला होता, तर प्रत्येक वेळी जेतेपद जिंकण्यात मुंबईला यश आले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने दोनदा खेळला आहे. याखेरीज पंजाब, राजस्थान आणि आता दिल्ली संघाने एका वेळेस अंतिम सामन्यात धडक दिली आहे. डेक्कन चार्जर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांनीही एक-एक अंतिम सामने खेळले आहेत. परंतु आता हे संघ स्पर्धेचा भाग नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय