---Advertisement---

मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान

On: रविवार, ऑगस्ट 2, 2020 8:22 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या यशामागचे रहस्य सांगितले आहे. चोप्रा म्हणाला की, आयपीएलपुर्वी होणाऱ्या लिलावात मुंबई संघ जो रणनिती आखतो, त्यामुळेच त्यांना यश मिळते. तसेच, संघाद्वारे युवा खेळांडूवर दाखवल्या जाणाऱ्या विश्वासाचीही त्याने प्रशंसा केली आहे. चोप्राला वाटते की, युवा खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्सला खूप फायदा झाला आहे.

चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ अर्थात मुंबई इंडियन्सच्या यशाविषयी चर्चा केली. समालोचक चोप्रा म्हणाला की, “रणनिती बनवण्यात मुंबई इंडियन्स जबरदस्त आहे. त्यामुळे मुंबई आर्धी आयपीएल लढाई तर लिलावातच जिंकून घेतो. त्यांची रणनिती टॉप क्लास असते. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, जो आयपीएलच्या टेबलवर अर्धा विजय मिळवतो. त्यांच्याकडे प्रत्येक क्रमांकासाठी बॅकअप उपलब्ध असतो.”

चोप्रा पुढे बोलताना म्हणाला की, “जेव्हा तुम्ही इतके चांगले खेळाडू जमा करता, तेव्हा तुमच्या काही खेळाडूंना सामन्यादरम्यान दुखापत झाली किंवा त्यांचा फॉर्म चांगला नसेल. तरी तुम्हाला कोणतीही समस्या येत नाही. हेच मुंबई इंडियन्सच्या यशामागील गुपित आहे. शिवाय, मुंबई इंडियन्स हा संघ युवा खेळाडूंना घडवण्याचे काम करतो. त्यांची चांगली तयारी करुन घेतो. पुढे हेच युवा खेळाडू मोठे क्रिकेटपटू बनतात.”

मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा विजेतेपद पटकावणारा संघ आहे. त्यांनी २०१३ला पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी रोहित शर्मा हा पहिल्यांदा संघाचा कर्णधार बनला होता. त्यानंतर रोहितच्या नेतृत्त्वाखाली २०१५, २०१७ आणि २०१९ या आयपीएल हंगामात त्यांनी विजेतेपद पटकावले.

महत्त्वाच्या बातम्या –

-दूसऱ्या वनडे सामन्यापुर्वी इंग्लंडला बसला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू झाला मालिकेतून बाहेर

-सारा तेंडूलकर व शुबमन गिलच्या इंस्टा पोस्टचा कॅप्शन सारखाच, दोघेही होताय सोशल मीडियावर ट्रोल

-एकवेळी धोनीवर दंड ठोठावणारा पंचच आता म्हणतोय धोनी जगातील सर्वात हुशार क्रिकेटपटू

ट्रेंडिंग लेख –

भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर

-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही

-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---