इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघातील वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो यंदा आयपीएल खेळणार नाही, असे म्हटले जात होते. अशात, युएसए क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज अली खानला गर्नीच्या जागी केकेआर संघात सामाविष्ट करण्यात आले आहे. Ali Khan Joins Kolkata Knight Riders In The Replacement Of Harry Gerney
२९ वर्षीय अली खान हा नुकताच विजेता ठरलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचा भाग होता. त्याने सेंट लूसिया ज्यूक्स संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ३.१ षटकात २५ धावा देत २ विकेट्स चटकावल्या होत्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
खान हा १४० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे केकेआर संघाला डावाच्या शेवटी त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. त्याने आतापर्यंत सीपीएलमध्ये ३१ सामने खेळत ३५ विकेट्स चटकावल्या आहेत. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा ८.३३ इतका होता.
दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखालील केकेआर संघाने आतापर्यंत २वेळा आयपीएल ट्रॉफी पटकावली आहे. २०१२ आणि २०१४ साली त्यांनी हा पराक्रम केला होता. तसेच त्यांनी २०१६, २०१७ आणि २०१८ असे सलग तीन वर्षे प्लेऑफमध्येही स्थान मिळवले होते. आता केकेआर यावर्षी तिसरे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळताना दिसेल.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. तर, केकेआरचा यावर्षीचा पहिला सामना २३ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आबु धाबी येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सराव करताना धोनीने मारलेला षटकार पाहून मुरली विजय झाला दंग; बोलती झाली बंद
-सीएसके संघात रैनाच्या जागी ‘हा’ असेल आदर्श खेळाडू; दिग्गजाने दिला पर्याय
-१५-२० नाही तर तब्बल ४५ खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार हा संघ
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट