---Advertisement---

या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?

On: शनिवार, सप्टेंबर 12, 2020 7:39 AM
---Advertisement---

आयपीएलच्या मागील १२ वर्षांचा इतिहास पाहता केवळ ३ असे संघ आहेत, जे पहिल्या हंगामापासून खेळत असूनही अजून आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. ते तीन म्हणजे संघ किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल हे आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब संघ २०१४ च्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचला होता पण त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला.

त्यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. आयपीएल २०१४ मध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर या जोडीने शानदार फलंदाजी केली. तर अंतिम सामन्यात वृद्धिमान साहानेही शतकी खेळी करुन संघाची मोठी धावसंख्या उभारण्यात महत्वाचे योगदान दिले. पण केकेआरने ते लक्ष्य गाठले आणि २०१४ चे चषक जिंकले. त्यानंतर कधीही किंग्ज इलेव्हन पंजाब संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला नाही. गेल्या २ हंगामात या संघाने चांगली सुरुवात केली होती तो प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही.

मात्र या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आयपीएल चषक जिंकू शकतो. २०१४ मध्ये जेव्हा संघ अंतिम फेरीपर्यंत गेला तेव्हा त्या मोसमातील निम्मे सामने युएईमध्ये खेळले गेले. यावेळी यूएईमध्ये आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळला जात आहे, त्यामुळे पंजाब संघाला नशीब पुन्हा एकदा पाठिंबा देऊ शकेल. याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघ या हंगामात आयपीएल चॅम्पियन का होऊ शकतो हे या लेखात जाणून घेऊ.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आयपीएल २०२० चे विजेतेपद का जिंकू शकते याची ३ कारणे.

३. अनिल कुंबळे आणि केएल राहुल यांची प्रशिक्षक आणि कर्णधार अशी जोडी

या हंगामात अनिल कुंबळे हे किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि केएल राहुल हा संघाचा नवा कर्णधार आहे. ही जोडी संघासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होऊ शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे दोन्ही दिग्गज एकाच राज्यातील आहेत आणि एकमेकांच्या जवळचे आहेत. याशिवाय मयंक अगरवाल, कृष्णाप्पा गॉथम, करुण नायर हे खेळाडूदेखील कर्नाटकचे आहेत.

जेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात समन्वय मजबूत असतो, तेव्हा संघाचे संयोजन खूप चांगले होते आणि त्याचा परिणाम मैदानात दिसून येतो. आयपीएल २०२० चे विजेतेपद जिंकण्यासाठी हे एक प्रमुख कारण होऊ शकते.

२. मधल्या फळीत आहेत दिग्गज फलंदाज

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे मधल्या फळीमध्ये जबरदस्त फलंदाज आहेत. केएल राहुल आणि ख्रिस गेल बाद झाल्यानंतरही त्यांच्याकडे अनेक स्फोटक फलंदाज आहेत.

त्यात ग्लेन मॅक्सवेल या हंगामातून संघात पुनरागमन करीत आहे. तसेच निकोलस पूरणने सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याचबरोबर मयंक अगरवाल, करुण नायर आणि जिमी नीशम सारखे महान खेळाडूही आहेत. ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा पंजाबचा महान फलंदाज म्हणून सिद्ध होऊ शकतो. फलंदाजीच्या जोरावर देखील हा संघ आयपीएल २०२० चा विजेता संघ होऊ शकतो.

१. वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज यांचे चांगले मिश्रण

किंग्स इलेव्हन पंजाबची गोलंदाजीही या मोसमात चांगली असल्याचे दिसते. संघात मुजीब उर रहमान, कृष्णप्पा गॉथम, मुरुगन अश्विन आणि १९ वर्षांखालील स्टार गोलंदाज रवी बिश्नोई हे फिरकीपटू आहेत. दुसरीकडे वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजचा युवा खेळाडू शेल्डन कोटरल, इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन आणि भारताचा मोहम्मद शमी हे आहेत. या सर्व गोलंदाजांना टी-२० क्रिकेटचा चांगला अनुभव आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---