---Advertisement---

आयपीएल-2020 : ‘ही’ माहिती पाहिल्यावर तुमचं टाॅसबाबतचं मत नक्की बदलेल

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 10:50 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यातील पहिला सामना शनिवारी (१९ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ९ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या होत्या. मुंबईने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने ५ विकेट्स गमावत १६५ धावा करत पूर्ण केले. अशाप्रकारे चेन्नईने नाणेफेक जिंकत सामनाही आपल्या नावावर केला.

यासोबतच स्पर्धेत आतापर्यंत ७ सामने खेळण्यात आले आहेत. या खेळलेल्या सामन्यांमध्ये चेन्नई संघ सोडला, तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघांना सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

स्पर्धेतील दुसरा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ८ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघानेही ८ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या. अशाप्रकारे सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हर खेळावी लागली होती. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये दिल्ली संघाने सामना आपल्या नावावर केला.

यानंतर तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि प्रथम फलंदाजीला आलेल्या बेंगलोर संघाने ५ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबाद संघाचा डाव १५३ धावांवरच संपुष्टात आला आणि पराभव स्विकारावा लागला. अशाप्रकारे बेंगलोरने १० धावांनी हा सामना जिंकला.

चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात पार पडला. यामध्ये पुन्हा चेन्नई संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान संघाने ७ विकेट्स गमवात सर्वाधिक २१६ धावा केल्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाला ६ विकेट्स गमावत केवल २०० धावा करता आल्या. अशाप्रकारे नाणेफेक जिंकलेल्या चेन्नई संघाला १६ धावांनी पराभव स्विकारावा लागला.

पुढे पाचवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. कोलकाता संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ५ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाता संघाला ९ विकेट्स गमावत केवळ १४६ धावाच करता आल्या. त्यामुळे नाणेफेक जिंकलेल्या कोलकाताला आपला स्पर्धेतील पहिला सामना गमवावा लागला.

स्पर्धेतील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात पार पडला. या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेल्या पंजाब संघाने केवळ ३ विकेट्स गमावत २०६ धावा ठोकल्या. पंजाबच्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाचा डाव १७ व्या षटकातच १०९ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पंजाब संघाने ९७ धावांनी सामना आपल्या नावावर केला.

त्यानंतर स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यातही चेन्नईने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ३ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या. दिल्लीच्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाने ७ विकेट्स गमावत केवळ १३१ धावाच केल्या. त्यामुळे चेन्नईला दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

आतापर्यंत नाणेफेक जिंकलेल्या सामन्यांचे निकाल

नाणेफेक जिंकलेला संघ- चेन्नई सुपर किंग्ज, सामन्यात विजयी झालेला संघ- चेन्नई सुपर किंग्ज

नाणेफेक जिंकलेला संघ- किंग्ज इलेव्हन पंजाब, सामन्यात विजयी झालेला संघ- दिल्ली कॅपिटल्स

नाणेफेक जिंकलेला संघ- सनरायझर्स हैदराबाद, सामन्यात विजयी झालेला संघ- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

नाणेफेक जिंकलेला संघ- चेन्नई सुपर किंग्ज, सामन्यात विजयी झालेला संघ- राजस्थान रॉयल्स

नाणेफेक जिंकलेला संघ- कोलकाता नाईट रायडर्स, सामन्यात विजयी झालेला संघ- मुंबई इंडियन्स

नाणेफेक जिंकलेला संघ- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सामन्यात विजयी झालेला संघ- किंग्ज इलेव्हन पंजाब

नाणेफेक जिंकलेला संघ- चेन्नई सुपर किंग्ज, सामन्यात विजयी झालेला संघ- दिल्ली कॅपिटल्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---