श्रीलंकाचा माजी क्रिकेटपटू आणि १९९६ सालच्या विश्वविजेता संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा याची आपल्या देशातील विरोधी पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड होऊ शकते. श्रीलंकाचा सर्वात जुना राजकारणी पक्ष यूनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) यांनी नुकत्याच लोकसभा निवडणुकमध्ये पराभवाचे तोंड पाहिले आहे. त्यांना यंदा एकही सीटही जिंकता आली नाही. अशात रणतुंगा याच पक्षात सामील होणार आहे. Arjun Ranatunga Will Be Leader Of Shri Lanka Opposition Party UNP
यूएनपीच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रीलंकाचे माजी प्रधानमंत्री रनिल विक्रमासिंघे यांनी पार्टीच्या नेतृत्त्वपदावरुन राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते गेल्या २६ वर्षांपासून यूएनपीचे नेतृत्त्व करत आहेत. परंतु, यंदाचा पराभव त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट पराभव होता. १९७७नंतर विक्रमासिंघे यांची ही पहिली वेळ आहे, जेव्हा त्यांच्या पक्षातील एकही सदस्य लोकसभा निवडणूकीत जिंकू शकला नाही. या पक्षाला २२५ संसदीय जागांवर केवळ दोन टक्के मते मिळाली असून यावेळी त्यांचे कोणतेही सदस्य खासदार होऊ शकले नाहीत.
१९४६ साली स्थापित झालेल्या यूएनपीचे अध्यक्ष विक्रमासिंघे यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला नव्या अध्यक्षाचा तपास आहे. त्यामुळे रणतुंगाव्यतिरिक्त यूएनपीचे महासचिव आणि विक्रमासिंघे यांचे चुलत भाऊ रुवान विजयवर्धने आणि माजी सभापती करु राजसूर्या यांच्याकडे पक्षाचा भविष्यातील अध्यक्ष म्हणून पाहिले जात आहे.
याविषयी बोलताना रणतुंगाने सांगितले होते की, “निवडणुकीत आलेल्या निकालांना पाहिल्यानंतर पक्षाने कार्यकारी समितीची बैठक बोलावली होती. त्यामध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी ४ नावांचे प्रस्ताव मांडण्यात आले, यात माझ्याही नावाचा समावेश आहे. जर मला पक्षाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली तर मला खुप आनंद होईल.”
रणतुंगाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ९३ कसोटी सामने खेळले होते. दरम्यान त्याने ५१०५ धावा केल्या होत्या. तर, वनडेत २६९ सामन्यात ७४५६ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ही’ गोष्ट घडली नसती तर एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसता
असा साजरा केला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आईचा ८३ वा वाढदिवस
टी२० क्रिकेटमध्ये झाली नव्या विश्वविक्रमाची नोंद, या अष्टपैलू क्रिकेटरने केलाय हा कारनामा
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
आयपीएल २०२० मधून बाहेर पडलेल्या रैनाच्या जागी लागू शकते या खेळाडूंची सीएसकेमध्ये वर्णी