भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंतला वाटते की, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन तेंडुलकरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळण्याइतपत क्षमता आहे. तसेच तो म्हणाला की, भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या एमएस धोनीच सोडवू शकतो. धोनीत अजूनही तेवढी क्षमता आहे.
सोशल मीडियाच्या हॅलो ऍपवर जेष्ठ क्रिडा पत्रकार विमल कुमार यांच्यासोबत झालेल्या लाईव्ह चॅटमध्ये श्रीसंत असे म्हणाला. श्रीसंत अर्जुनच्या भविष्याविषयी बोलत म्हणाला, “पाजींचा मुलगा अर्जुनमध्ये कमालीची क्षमता आहे. तो मेहनतीही आहे. भविष्यात तो भारतीय संघाकडून खेळू शकतो.” S shreesanth says that, Arjun tendulkar is the future superstar of cricket.
अर्जुन सध्या ज्यूनिअर मुंबई संघाकडून क्रिकेट खेळत आहे. तो संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तसेच, तो चांगली कामगिरी करत आहे.
भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात, सध्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध चालू आहे. याबाबतीत बोलताना श्रीसंत म्हणाला, “माझ्या मते भारतीय संघातील चौथ्या स्थानासाठी धोनीपेक्षा चांगला फलंदाज इतर कोणीही नाही. त्याने आजवर खूप चांगली खेळी केली आहे आणि आताही त्याच्यात तेवढीच क्षमता आहे. केएल राहूल, केदार जाधव आणि श्रेयस अय्यरनेही खूप धावा केल्या आहेत. परंतु, जे धोनीत आहे ते इतर कोणातही नाही. हेच मी विश्वचषकापुर्वीही म्हणालो होतो.” No one is better than ms dhoni for india’s 4th place.
भविष्यात प्रशिक्षण करणार का खेळणार? असा प्रश्न विचारला असता. श्रीसंत म्हणाला, “मला अजून पुढील ४ वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. आतापर्यंत खूप काही शिकलो आहे. पण अजून बरच काही शिकायच बाकी आहे. पण हे मात्र नक्की आहे की, मी युवा खेळाडूंना नेहमी मदत करत राहील.”
तसेच, ‘स्वत:वरचा विश्वास कधीही कमी नाही झाला पाहिजे. यश मिळवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे,’ असा संदेशही श्रीसंतने युवा खेळाडूंना दिला आहे.
हॅलोवरील लाईव्ह चॅटमध्ये श्रीसंत प्रशिक्षणाबद्दलही बोलला. “भारत अरुण हे उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. पण, जर झहीर खान प्रशिक्षक बनला, तर खेळाडूंना त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. झहीर हा अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याला क्रिकेटच्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत.”
शेवटी श्रीसंतने चाहत्यांच्या मागणीनुसार इंग्लिश रॅप गायला. २०११मध्यील यशस्वी विश्वचषक संघाचा सदस्य असणारा श्रीसंत अभिनेताही आहे. त्याने टीम ५ या मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका निभावली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
रोहित जगातील गोलंदाजांना धु- धु धुतो, परंतु या दोन गोलंदाजांना जाम घाबरतो
जर गल्ली क्रिकेट खेळला असला तर तुम्हाला शंभर टक्के माहित असणार हे २०…
सनी लियाॅनबरोबर डिजे ब्रावोचा लाईव्ह डान्स, सोशल मीडियावर झाली एकच…