भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका झाली. ही मालिका ऑस्ट्रेलिया संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली. मात्र, या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (२ डिसेंबर) कॅनबेरा या ठिकाणी झाला. हा सामना भारतीय संघाने 13 धावांनी जिंकला आणि व्हाईटवाश टाळला. भारतीय खेळाडू या सामन्यात आपली भूमिका समजून मैदानावर उतरले होते आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघावर भारी पडले. काट्याची टक्कर झालेल्या सामन्यात भारताने आपले वर्चस्व राखले.
डेविड वॉर्नर हा या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याची उणीव ऑस्ट्रेलिया संघाला नक्कीच भासली असणार.
त्याच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाजसुद्धा जास्त धावा काढण्यात अपयशी ठरले. मागील दोन सामन्याच्या तुलनेत तिसर्या सामन्यात ऑस्ट्रेलिया फलंदाजांचा स्तर कमी राहिला.
ऑस्ट्रेलिया संघाचा कोणत्या तीन कारणामुळे पराभव झाला हे आज आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.
1. विराट कोहलीची उपयुक्त खेळी
पहिल्या डावात भारतीय फलंदाजी दरम्यान पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर तिसर्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला आला. तो पूर्णपणे खेळपट्टीवर टिकून होता आणि एका बाजूने विकेट्स पडत होत्या. विराट कोहलीने संथ मात्र उपयुक्त अशी महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. भारतीय धावफलकावर त्याच्या 63 धावांचा पराभव खूप जास्त राहिला आणि ऑस्ट्रेलियासाठी हे अर्धशतक पराभवासाठी कारणीभूत ठरले.
2. पंड्या आणि जडेजाची महत्त्वपूर्ण भागिदारी
जेव्हा भारतीय संघाची पाचवी विकेट 152 धावसंख्येवर गेली, तेव्हा वाटले होते की भारतीय संघ 250 धावा सुद्धा उभारू शकणार नाही. परंतु हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी ही कल्पनाच बदलून टाकली. दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागिदारी केली. ही भागिदारी भारतीय संघासाठी संजीवनी ठरली आणि संघाची धावसंख्या 300 च्या पार पोहोचली.
3. शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी
शार्दुल ठाकूरला या मालिकेत खेळण्याची प्रथमच संधी मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा उचलत दमदार कामगिरी करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. शार्दुलने आपल्या कोट्यातून जास्त धावा जावू न देता 3 गडी बाद केले. आयपीएल स्पर्धेतील अनुभव दाखवताना मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लक्ष्यापासून 13 धावा पूर्वीच बाद करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 51 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
ट्रेंडिंग लेख-
रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी लागू शकते ‘या’ तीन दिग्गजांची वर्णी
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्या स्थानी