---Advertisement---

‘…म्हणून बदलली बॅट,’ ‘सामनावीर’ हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा

On: सोमवार, डिसेंबर 7, 2020 1:41 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात विराटसेनेने रविवारी (6 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने मात दिली. त्यामुळे भारतीय संघाने या मालिकेत 2-0 या फरकाने विजयी आघाडी घेतली. 22 चेंडूत 44 धावा फटकावल्यामुळे हार्दिक पंड्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. सामन्यानंतर त्याने आपल्या बॅटबद्दल मोठा खुलासा केला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 194 धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता. हे आव्हान भारतीय संघाने 19.4 षटकात पूर्ण केले. खरं तर ऑस्ट्रेलिया संघाने चांगल्या प्रकारे सामन्यात पुनरागमन केले होते. मात्र, त्यांच्याकडे हार्दिक पंड्याच्या फलंदाजीचे उत्तर नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला हा सामना गमावा लागला आणि त्याचबरोबर त्यांनी मालिकासुद्धा गमावली. भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात 25 धावांची गरज होती. 19 व्या षटकात एँड्र्यू टाय गोलंदाजीला आल्यानंतर हार्दिकने दोन चेंडू खेळून बॅट बदली केली.

हार्दिकसाठी बॅट बदलायचा निर्णय योग्य ठरला. त्याने पुढील दोन चेंडूवर चौकार ठोकत 8 धावा काढल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची आवश्‍यकता होती. सामना संपल्यानंतर जेव्हा पंड्याला बॅट बदलण्यावरून प्रश्न विचारला असता तो म्हणाला, तसाही त्यामुळे काही फरक पडणार नव्हता, आणि तरीही मी ते दोन चेंडू मारणारच होतो.

“…म्हणून बदलली बॅट”

तो म्हणाला, “त्यावेळी माझ्या डोक्यात हा विचार चालला होता की आम्ही फक्त 2 चांगल्या फटक्यापासून दूर होतो. मी षटकार मारण्यापेक्षा जास्त सामना संपवण्याचा प्रयत्न करत होतो आणि हे मी करण्यात यशस्वी झालो. मला सामन्याला शेवटच्या चेंडूपर्यंत घेवून जायला चांगले वाटत नाही. बॅट बदलण्यामागे काही खास कारण नव्हते. तसंही मी चेंडूला मारणारच होतो. माझी बॅट तुटली होती आणि मी मागील तीन वर्षांपासून त्या बॅटने खेळत होतो. हे ठीक वाटले म्हणून बॅट बदलली”.

अशाप्रकारे भारतीय संघाने शेवटचे दोन चेंडू आणि सहा गडी राखून विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य

हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत

कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---