भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे 3 सामन्याची टी-20 मालिका खेळली जात आहे. यातील पहिला टी-20 सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल या मैदानात झाला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 161 धावसंख्या उभारली आणि ऑस्ट्रेलिया संघाला 162 धावांचे लक्ष्य दिले. भारतीय संघासाठी कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात आपल्या युवा फिरकीपटू युझवेंद्र चहल याला संघात सहभागी केले नव्हते. परंतु दुसर्या डावात चहल मैदानावर उतरला. त्याचबरोबर त्याने धुमाकून घातल 3 विकेट्सही घेतल्या.
प्लेईंग इलेव्हनमध्ये नसूनही चहलने मैदानावर गोलंदाजी कशी केली?, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. परंतु त्याला संघात स्थान कसे मिळाले याबद्दल जाणून घेऊया.
नाबाद 44 धावांची जडेजाची उपयुक्त खेळी
विशेष म्हणजे भारतीय संघात आज रवींद्र जडेजा आणि वाशिंग्टन सुंदर दोन फिरकीपटू गोलंदाज म्हणून संघात सहभागी केले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ संघर्ष करताना दिसून येत होता, तेव्हा त्या ठिकाणी भारतीय संघाला रवींद्र जडेजाने सन्मानजनक धावसंख्येवर पोचण्याची भूमिका निभावली. भारतीय संघाने फक्त 92 धावसंख्येवर 5 गडी गमावले होते, तर लगेच 114 धावसंख्येवर हार्दिक पंड्यासुद्धा तंबूत परतला.
19.3 षटकात जडेजाच्या डोक्याला दुखापत
या ठिकाणी जडेजाने भारतीय संघाच्या डावाला सावरताना 23 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 44 धावांची खेळी केली. डावाच्या 19 व्या षटकात जॉश हेजलवूडचा तिसरा चेंडू जडेजाच्या डोक्याला लागला आणि हॅमस्ट्रिंगमध्येही अडचण दिसून येत होती. परंतु दुसरा डाव सुरू झाला, तेव्हा सामन्याचे पंच डेविड बून यांनी सांगितले की जडेजाच्या जागी चहल मैदानात उतरेल दिसेल.
आयसीसीने नुकतेच काही महिन्यापूर्वी नवीन नियम लागू
आयसीसीने नुकतेच काही महिन्यापूर्वी नवीन नियम लागू केले आहेत. ज्यामधे कन्कशन नियमाचासुद्धा समावेश आहे. या नियमानुसार जर कोणताही खेळाडू डोक्याच्या दुखापतीच्या कारणामुळे बाहेर गेला, तर त्याच्या जागी संघातील त्याच्या सारखाच खेळाडू सहभागी केला जातो. उदाहरणार्थ, कोणता फिरकीपटू, फलंदाज आणि गोलंदाज कन्कशनच्या कारणामुळे बाहेर पडतो, तेव्हा त्याच्या जागेवर त्याच्यासारखाच खेळाडू त्याची जागा संघात घेवू शकतो.
पहिला डाव संपल्यानंतर जेव्हा जडेजा बाहेर गेला आणि त्याची कन्कशन नियमानुसार फिजिओने तपासणी केली. आणि पंचांना त्याच्या प्रकृतीबद्दल सांगितले. परंतु चहलच्या मैदानावर येण्याने ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक लँगर नाराज दिसून आले.
टी-20 मध्ये कन्कशनमुळे बदली होणारा चहल पहिला खेळाडू ठरला
युझवेंद्र चहल हा या नियमानुसार बदली करून खेळवण्यात आलेला पहिला खेळाडू ठरला आणि हा बदल भारतीय संघासाठी खूप फायदेशीर ठरला. चहलने 16 षटके संपेपर्यंत 4 षटके गोलंदाजी करून 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. यामध्ये ऍरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कमाल लाजवाब…! जगात फक्त तीन फलंदाजांना करता आलेला विक्रम केएल राहुलच्याही नावावर
नटराजनचा ऑस्ट्रेलियात डंका, केली बुमराहच्या विक्रमाची बरोबरी
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर