क्रिकेट हा कायमच अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे फिरते. एक खेळाडू अशी काही चमत्कारी खेळी करतो किंवा गोलंदाजी करताना असा स्पेल टाकतो की, प्रतिस्पर्धी संघाकडे त्याचे काही प्रत्युत्तर नसते. हा एकच खेळाडू विरुद्ध संघातील अकरा खेळाडूंवर भारी पडतो.
आज आपण कसोटी क्रिकेटमधील अशाच पाच खेळ्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये एका खेळाडूने खेळलेल्या खेळीची बरोबरी विरोधी संघातील अकरा फलंदाज दोन वेळा फलंदाजी करूनही करू शकले नाहीत.
१. रॉबर्ट एबल- १२० धावा (विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
इंग्लंडचे माजी दिग्गज खेळाडू रॉबर्ट एबल यांनी १९८९ मध्ये प्रथम असा कारनामा केला होता. इंग्लंडचा संघ १९८९ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील दुसऱ्या केप टाऊन कसोटीत एबल यांनी इंग्लडकरून सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना १२० धावांची शतकी खेळी केली. एबल यांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात २९२ धावा उभारल्या.
प्रत्युत्तरात, जॉनी ब्रिग्ज यांनी मिळवलेल्या सात बळींमूळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४७ धावांमध्ये गुंडाळला गेला. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला फॉलो ऑन देत दुसऱ्यांदा फलंदाजी करायला लावली. ब्रिग्ज यांनी पुन्हा दुसऱ्या डावात ८ बळी घेत, दक्षिण आफ्रिकेचा डाव ४३ धावांत संपवला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन्ही डावात मिळून अवघ्या १०० धावा बनवू शकला.
२. सर लेन हटन- ३६४ धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
सर जॅक हॉब्स यांच्यानंतर इंग्लंडचे सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले गेलेले सर लेन हटन यांनी देखील अशा प्रकारची कामगिरी केली आहे. सन १९३८ च्या ऍशेस मालिकेतील पाचव्या कसोटी त्यांनी हा कारनामा केला होता. हटन यांनी पहिल्या डावात इंग्लंडकडून सलामीला उतरत ३६४ धावांची विक्रमी खेळी केली. हटन यांच्या या त्रिशतकानंतर इंग्लंडने विश्वविक्रमी ९०७ धावांचा डोंगर उभा केला होता.
इंग्लंडच्या ९०७ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २०१ धावांवर संपला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर डॉन ब्रॅडमन यांनी दुखापतीमुळे फलंदाजी केली नाही. फॉलोऑननंतर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात अजूनच दुर्दशा झाली. फर्नस व बो यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १२३ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन संघ दोन वेळा फलंदाजी करूनही हटन यांच्या ३६४ धावांची बरोबरी करू शकला नाही.
३. सर डॉन ब्रॅडमन- १८५ धावा (विरुद्ध भारत)
सन १९४७ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असता, दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. ब्रिस्बेन येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनी पहिल्या डावात १८५ धावांचा तडाखा दिला. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ३८२ धावांवर घोषित केला.
लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या डावात धसमुसळी फलंदाजी करत फक्त ५८ धावा काढल्या. दुसऱ्या डावात ही परिस्थिती फारशी बदलली नाही. तोशॅक यांच्या पाच बळींमुळे भारताचा दुसरा डावही शतकापार जाऊ शकला नाही. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ९८ धावा बनविल्या होत्या. विशेष म्हणजे तो सामना आजच्या तारखेला (४ डिसेंबर) समाप्त झाला होता.
४. इंझमाम उल-हक- ३२९ धावा (विरुद्ध न्यूझीलंड)
सन २००२ मध्ये पाकिस्तान व न्यूझीलंड मालिकेतही अशा प्रकारची कामगिरी पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज इंजमाम उल-हकने केली होती. लाहोर कसोटीतील पहिल्या सामन्यात इंजमामने ३२९ धावा तडकावत पाकिस्तानला ६४३ धावांपर्यंत मजल मारून दिली.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या सहा बळींमूळे न्यूझीलंडचा पहिला डाव ७३ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने थोडाफार प्रतिकार केला. दानिश कनेरियाने पाच बळी मिळवत न्यूझीलंडचा दुसरा डाव २४६ धावांवर रोखून पाकिस्तानला एक डाव आणि ३२४ धावांनी मात देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
५. मॅथ्यू हेडन- ११९ धावा (विरुद्ध पाकिस्तान)
सन २००२ मध्ये शारजा येथे झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नच्या फिरकीपुढे पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या ५९ धावांत गडगडला. त्यानंतर, फलंदाजीला उतरलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू हेडन याने ११९ धावांची लाजवाब शतकी खेळी केली. हेडनच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया ३१० धावांची मजल मारू शकला. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावातही काही खास करू शकला नाही. वॉर्नने पुन्हा एकदा चार बळी मिळवत पाकिस्तानला ५३ धावांवर रोखले.
ट्रेंडिंग लेख-
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता..! ‘या’ गोलंदाजाने मोडला पॉन्टिंगचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, आता लक्ष्य एमएस धोनी
ब्रेकिंग! वनडे पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही टी नटराजनचे पदार्पण
एमएस धोनीमुळेच झालं शक्य ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफानी खेळीबद्दल जडेजाचा मोठा खुलासा