मुंबई । कोविड 19 च्या साथीमुळे यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेला स्थगिती मिळाली. या वेळेत बांगलादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्याचा विचार करत आहे. कोरोनामुळे बांगलादेश संघाने श्रीलंकाविरुद्ध होणारी तीन सामन्यांची कसोटी मालिका स्थगित केली होती. बांगलादेश ही कसोटी मालिका पुन्हा भरविण्याचा विचार करत आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी 20 विश्वचषक स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी तहकूब केली आहे.
त्यांनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) श्रीलंका मंडळाशी चर्चा करीत आहे. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन कसोटी सामन्याची मालिका ऑक्टोबरमध्ये आयोजित होऊ शकेल.
तीन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी कसोटी चँपियनशिपचा एक भाग आहे, जी यापूर्वी जुलै ते ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोना साथीमुळे पुढे ढकलण्यात आली होती.
बांगलादेश संघातील प्रमुख खेळाडू सहा वेगवेगळ्या मैदानावर वैयक्तिकरित्या सराव करत आहेत. मागील आठवड्यापासून सुरु झालेल्या या प्रशिक्षणात हे खेळाडू तंदुरुस्तीवर भर देताहेत.






