मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही बाजूने स्विंग करण्यात माहीर असलेला दीपक चाहर खूप कमी वेळेत क्रिकेटमध्ये स्वतःची छाप पाडली आहे. जसप्रीत बुमरा यांच्या गैरहजेरीत दीपकने एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यात क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. या क्रिकेटपटूला देखील मध्यंतरी दुखापतीने ग्रासले होते. त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर जाता आले नाही.
दीपक चाहर हा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. यासोबत त्याची बहीण मालती देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. मालती ही व्यवसायाने एक मॉडेल आणि अॅक्टर असून तिचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची सर्वात जास्त चर्चा होत आहे.
दीपकची बहीण मालती ही एका व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसून येत आहे. लॉकडाऊनची परिस्थिती पाहून तीने डान्स करण्यासाठी हे गाणे निवडले आहे. पण तिला हे गाणे अश्लील असल्याचे माहित नसावे. तिच्या फॅन्सने या गाण्याबद्दल कमेंट्सद्वारे माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/B-CJ4bugK1y/?utm_source=ig_embed
दीपकची बहीण मालती ही सर्वांना परिचित आहे. आयपीएलच्या दरम्यान आपल्या भावाला सपोर्ट करण्यासाठी सामने पाहण्यासाठी ती स्टेडियमवर जात असे. चेन्नई सुपरकिंग ही मालतीची सर्वात आवडती टीम असून धोनीची ती खूप मोठी फॅन आहे. अनेकदा तिने धोनीसोबत फोटो देखील काढलेले आहे.
मालतीने लखनौ येथून बीटेकची पदवी प्राप्त केल्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे ठरवले. २०१४ साली झालेल्या मिस इंडिया नॉर्थ रिंजन ची ती रनरअप आहे. तसेच मिस इंडिया प्रत्येक स्पर्धेत मालतीला यश मिळाले. त्यानंतर तिला जाहिरातीचा अनेक ऑफर येऊ लागल्या.
मालती इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी तीचे व्हिडिओ पोस्ट करत असते. हे व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. ती स्वतःला फिट राखण्यासाठी नियमितपणे योगा करते. तसेच आपल्या वडिलांसोबत जिमला जाऊन स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करते.