---Advertisement---

पदार्पण करताच नशीब चमकले; 21 वर्षाचा स्टार खेळाडू पहिल्या कसोटीनंतरच केंद्रीय करारात सामील

---Advertisement---

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या गेममध्ये कधी, काय होईल, याबाबत काहीही सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये नशिबाचाही मोठा वाटा असतो. कोणत्या खेळाडूचे नशीब कधी चमकेल हे आधीच सांगणे फार कठीण असते. असाच काहीसा प्रकार 21 वर्षीय स्टार खेळाडूसोबत घडला आहे. ज्याने पदार्पण कसोटी सामना खेळल्यानंतर लगेचच मोठे यश मिळवले. युवा खेळाडूने पहिला कसोटी सामना खेळताच मोठी लॉटरी लागली. असे म्हणता येईल. तो स्टार खेळाडू इंग्लंडचा आहे.

वास्तविक, इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळला गेला. इंग्लंडने हा कसोटी सामना 8 गडी राखून जिंकला. या विजयाच्या मोबदल्यात संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या कसोटी सामन्यात जेकब बेथेलला इंग्लंडकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात बेथेलला काही विशेष करता आले नाही. पण दुसऱ्या डावात त्याने अवघ्या 37 चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. या शानदार खेळीचे बक्षीस आता बेथेलला केंद्रीय कराराच्या रूपाने मिळाले आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) जेकब बेथेलच्या करारात सुधारणा केली आहे. या डावखुऱ्या खेळाडूला आधी डेव्हलपमेंट करारात ठेवण्यात आले होते. पण आता त्याला दोन वर्षांचा केंद्रीय करार मिळाला आहे. बेथेलने एकत्रितपणे मोठी झेप घेतली आहे. बेथेल आता जो रूट, जोस बटलर आणि हॅरी ब्रूक सारख्या खेळाडूंच्या एलिट गटात सामील झाल आहे. दरम्यान, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स आणि ब्रेडन कार्स या वेगवान त्रिकूटानेही 2026 पर्यंत आपला करार वाढवला आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाचा 2 वर्षांचा केंद्रीय करार मिळालेले खेळाडूः जोफ्रा आर्चर (ससेक्स), गस ऍटकिन्सन (सरे), जेकब बेथेल (वॉरविकशायर), हॅरी ब्रूक (यॉर्कशायर), जोस बटलर (लँकेशायर), ब्रायडन कार्स (डरहम), मॅथ्यू पॉट्स (डरहम), जो रूट (यॉर्कशायर), जेमी स्मिथ (सरे), बेन स्टोक्स (डरहम), मार्क वुड (डरहम)

इंग्लंड क्रिकेट संघाचा एक वर्षाचा केंद्रीय करार : रेहान अहमद (लीसेस्टरशायर), जॉनी बेअरस्टो (यॉर्कशायर), शोएब बशीर (सॉमरसेट), जॅक क्रॉली (केंट), सॅम करन (सरे), बेन डकेट (नॉटिंगहॅमशायर), विल जॅक (सरे), जॅक लीच (सॉमरसेट), लियाम लिव्हिंगस्टोन (लँकेशायर), ऑली पोप (सरे), आदिल रशीद (यॉर्कशायर), फिल सॉल्ट (लँकेशायर), ऑली स्टोन (नॉटिंगहॅमशायर), जोश टंग (नॉटिंगहॅमशायर), रीस टोपली (सरे), ख्रिस वोक्स (वॉरविकशायर)

हेही वाचा-

सारा तेंडुलकरच्या हाती मोठी जबाबदारी, लंडनमधून शिक्षण घेऊन या फाऊंडेशनची डायरेक्टर बनली
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या फरकाने (धावांनी) विजय (टाॅप-5)
अश्लील शेरेबाजी, असभ्य कमेंट्स… टीम इंडियाच्या सराव सत्रात चाहत्यांचं गैरवर्तन!

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---