मुंबई । भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा एमएस धोनी हा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. आक्रमक फलंदाजी आणि संयमी नेतृत्व यासाठी ओळखला जाणार्या एमएस धोनीने जगभर आपले चाहते निर्माण केले आहेत. या माजी ‘कॅप्टन कूल’चा 7 जुलै रोजी वाढदिवस असतो. यंदा धोनी आपला 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
धोनीचे चाहते या तारखेची आतुरतेने वाट पाहात असतात. यंदाच्या वाढदिवसादिवशी धोनीला वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोकडून एक खास गिफ्ट मिळणार आहे. ब्राव्हो धोनीच्या वाढदिवसानिमित्त एक खास गाणे रिलीज करणार आहे. ब्रावोने तयार केलेले गाणे हे अंतिम टप्प्यात आहे.
ब्रावोने आपल्या चाहत्यांना हे गाणं धोनीच्या वाढदिवसा दिवशी रिलीज करायचे का?असा प्रश्न विचारल्यावर चाहत्यांनी त्याला होकार दिला आहे. चाहत्यांच्या या उत्तराला ब्रावोने देखील सकारात्मक प्रतिसाद देत धोनीच्या वाढदिवसा दिवशी हे गाणं रिलीज करण्याचे ठरवले आहे.
यावर ब्रावो म्हणाला की,”धोनीच्या वाढदिवसानिमित्त हे गाणं रिलीज करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. या गाण्यावर एक डान्स देखील बसवला आहे. ज्याला हेलिकॉप्टर हे नाव दिले आहे. ब्रावोने त्याच्या चाहत्यांना हेलिकॉप्टर डान्सचे व्हर्जन मागितले आहे. चाहत्यांनी पाठवलेल्या डान्स पैकी तो सर्वोत्तम डान्स निवडणार आहे. या गाण्यावर अधिक डान्स बसवण्यात येणार असल्याचे ब्रावोने सांगितले.
एमएस धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. क्रिकेट चाहते त्याला मैदानावर पाहण्यासाठी आतुर आहेत. यंदा आयपीएलमध्ये त्याचे पुनरागमन क्रिकेट चाहत्यांना पाहता आले असते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
डॅरेन ब्राव्हो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्याने आयपीएलच्या 134 सामन्यात खेळताना 23.17 च्या सरासरीने 1483 धावा केल्या आहेत. यासोबत गोलंदाजीत 147 बळीदेखील टिपले आहेत. वेस्ट इंडीज संघाकडून खेळताना 40 कसोटी सामन्यात 86 बळी घेतले तर 164 वनडे सामन्यात 199 बळी टिपले. कसोटीत 2200 आणि वनडेत 2968 धावा केल्या आहेत.






