---Advertisement---

केदार जाधवची सीबीआय चौकशी करा, चाहत्यांनी केली अजब मागणी

---Advertisement---

नवी दिल्ली। तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेला संघ चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल२०२० मध्ये ४ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी (७ ऑक्टोबर) अबू धाबी येथे झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नईचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नई संघाला आपल्या खराब फलंदाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर चेन्नईच्या खराब फलंदाजीवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. यादरम्यान चाहत्यांनी चेन्नई संघाचा फलंदाज केदार जाधववर निशाना साधला आहे. कर्णधार एमएस धोनीने पराभवानंतर म्हटले की, खराब फलंदाजीमुळेच त्यांच्या संघाला पराभव स्विकारावा लागला.

जिंकलेला सामना गमावला

कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १६८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघाला चांगली सुरुवात मिळाली. त्यांनी १२ व्या षटकात ९९ धावांवर एक विकेट गमावला होता. ही धावसंख्या पाहता चेन्नई संघ विजय नक्की मिळवणार असे वाटत होते. त्यानंतर मात्र ४७ चेंडूत ६९ धावांची आवश्यकता असताना चेन्नई संघाचे ८ विकेट्स पडले होते. परंतु चेन्नईने जिंकलेला सामना शेवटच्या षटकात आपल्या खराब फलंदाजीमुळे सामना गमावला.

केदार जाधवचा फ्लॉप शो

केदार जाधवला कोलकाता संघाच्या गोलंदाजांविरुद्ध एकेक धावेसाठी संघर्ष करावा लागला. धोनीच्या बाद झाल्यानंतर तो १७ व्या षटकात फलंदाजीला आला होता. त्याला आपले खाते खोलण्यासाठीच ५ धावा लागल्या. २० व्या षटकात जेव्हा चेन्नईला २६ धावांची आवश्यकता होती, तेव्हा त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव खेळले. त्यामुळे आता चेन्नई संघ ४ षटकार मारूनही जिंकू शकत नव्हता. तिसऱ्या चेंडूवर त्याने संघर्षाने १ धाव घेतली. जाधवने १२ चेंडूवर नाबाद ७ धावांची खेळी केली. सोबतच चेन्नईला १० धावांच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला.

https://twitter.com/angry_rantman/status/1313917298202218502

या पराभवानंतर एका चाहत्याने त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करत थेट सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

https://twitter.com/Tahir06529899/status/1314198402809294853

https://twitter.com/Pappuku14916946/status/1314198597278273536

यासोबतच केदार जाधवला संघातून बाहेर करण्याची मागणी करत आहेत. प्रत्येक जण त्याची थट्टा करत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---