25 सप्टेंबरला एशिया कप 2018 मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानमधील सामना पार पडला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने नेतृत्व केले होते. हा शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झालेला सामना अखेर बरोबरीत सुटला होता.
पण हा सामना बरोबरीत सुटल्याने स्टेडीयममध्ये सामना पहायला आलेल्या अर्जन सिंग एका चिमुकल्याला भारतीय चाहत्याला त्याचे अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्या मुलाच्या वडिलांनी त्याला समाजावण्याचा प्रयत्न केले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.
पण नंतर त्याने त्याच्या रडण्यामागील कारण सांगितले. त्याने एएनआयशी बोलताना सांगितले की ‘मी रडलो कारण धोनी त्याचा वनडे कर्णधार म्हणून शेवटचा आणि 200 वा सामना पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते.”
या सामन्यानंतर अर्जनला रडताना पाहुन भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही ट्विट केले होते. या ट्विटमध्ये‘काही नाही अंतिम सामना आपणच जिंकू’ अशा आशयाचे ट्विट त्याने केले होते.
Koi na putt Rona Nahi hai final aapa jittange 🇮🇳🇮🇳😘 pic.twitter.com/fjI0DWeBoy
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 25, 2018
हरभजनच्या या ट्विटला उत्तर देताना अर्जनच्या वडिल अमरप्रीत सिंग यांनी माहिती दिली की सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला फोन केला होता. ़
ते म्हणाले की “तो(लहान मुलगा) आता आनंदी आहे आणि आम्ही अंतिम सामनाही पाहणार आहोत. खरचं भुवनेश्वर कुमार चांगला आहे. त्याने त्याला फोन करुन समजावले आहे. आपण अंतिम सामन्यात नक्की पुनरागमन करु.”
@harbhajan_singh Paaji he is happy now and looking forward to the final on Friday… Really kind of @BhuviOfficial as well to call and console him… We will surely bounce back and it will be our "Fateh" on Friday 😊🇮🇳 Go Team India @BCCI pic.twitter.com/BPkBXO2hIv
— Amarpreet Singh (@itsamarpreet) September 25, 2018
@BhuviOfficial 's call 😊 Special moment for Arjan… Thank you Team India 🇮🇳 pic.twitter.com/Z5S6GgrrRQ
— Amarpreet Singh (@itsamarpreet) September 26, 2018
एवढेच नाही तर अर्जनसोबत अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशीद खान आणि मोहम्मद शेहजादने सेल्फीही काढले आहेत.
These Pics making India – Afghanistan Cricket Friendship bond even Stronger #INDvAFG #AsiaCup2018 pic.twitter.com/x84r2z8ziZ
— Abhijeet ♞ (@TheYorkerBall) September 26, 2018
अर्जनने त्या सामन्यातील शेवटच्या षटकामधील त्याच्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मला सामना आवडला. मला धोनी कर्णधार होता तेही आवडले. मी खूप आनंदी होतो. पण शेवटच्या चेंडूवर जडेजाने षटकार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी क्षेत्ररक्षकाला बाउंड्रीजवळ पाहिले होते. नंतर त्याने जडेजाचा झेल घेतला आणि मला रडू आले.”
अर्जन हा त्याच्या पालकांसह बांगलादेश विरुद्ध भारत संघात झालेल्या अंतिम सामन्यासाठीही स्टेडियममध्ये उपस्थित होता. भारताने हा अंतिम सामना 3 विकेट्सने जिंकत सातव्यांदा एशिया कपवर नाव कोरले होते.
अफगाणिस्तान विरुद्ध झालेला सामना धोनीचा भारताचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. तसेच तो त्याचा कर्णधार म्हणून २०० वा वनडे सामना होता. त्यावेळी तो २०० वनडे सामन्यात नेतृत्व करणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला होता.