चेन्नई। कॅप्टन कूल एमएस धोनीने काल (७ जुलै) आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. त्याने आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्जला आपल्या नेतृत्वात ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी धोनीबद्दल मोठे विधान केले आहे.
स्टार स्पोर्ट्स वनच्या तमिळ शोमध्ये बोलताना विश्वनाथन (Kasi Viswanathan) म्हणाले, “मला असे वाटते की येत्या १० वर्षांमध्ये धोनी सीएसकेचा बॉस होईल.”
आयपीएलच्या (IPL) सुरुवातीपासूनच धोनी सीएसकेशी (Chennai Super Kings) जोडला गेला आहे आणि त्याने सीएसकेचे कर्णधारपद (Captaincy) भूषविले आहे. त्याचबरोबर यादरम्यान सीएसके संघ एकदाही अव्वल ४ संघाच्या खाली राहिला नाही.
आतापासून काही वर्षांत सीएसकेने व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेऊन धोनी क्रीडा प्रशासनात आपले स्थान मिळवतो की नाही हे पहावे लागेल.
धोनी (MS Dhoni) ‘थाला’ (Thala) कसा बनला याबद्दल बोलताना विश्वनाथन म्हणाले, “मला केवळ एक गोष्ट माहीत होती, की तो संघात सर्वात चांगली कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे आम्ही त्याला थाला म्हणतो.”
धोनी एकमेव असा आंतरराष्ट्रीय कर्णधार आहे, ज्याने आयसीसी वनडे विश्वचषक, आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या संघाला जिंकून दिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी तसेच वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनीने झटक्यात निर्णय घेत म्हणाला, उरलेल्या ओव्हरमध्ये दादा करेल भारतीय संघाचे नेतृत्व
-इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत हे ५ खेळाडू ठरु शकतात हिरो