---Advertisement---

चेन्नई संघामागचा शनी काही जाईना! ‘या’ गोलंदाजाने केली मोठी चूक

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 4:29 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येक संघाला बायो बबलमध्ये राहावं लागत आहे व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे.

मात्र चेन्नईचा वेगवान गोलंदाज केएम आसिफ या गोलंदाजाने बायो बबल प्रोटोकॉलच उल्लंघन केल होतं. त्यानंतर त्याला 6 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावं लागलं, मात्र आता तो संघासोबत सराव सत्रात सामील झाला आहे.

आसिफने खोलीची चावी गमावली आणि त्याजागी दुसरी चावी घेण्यासाठी तो हॉटेल रिसेप्शनकडे गेला. हे बाबो बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन होते कारण हॉटेल रिसेप्शनचा समावेश बायो बबलमध्ये होत नाही.

या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संघांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. पहिल्यांदा नियम मोडला, तर सहा दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल व पगारही दिला जाणार नाही. दुसऱ्यांदा असे केले, तर दुप्पट कालावधीसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि एका सामन्यासाठी निलंबित केले जाईल. तिसऱ्यांदा खेळाडूने असे केल्यास, त्याला स्पर्धेतून काढून टाकले जाईल आणि त्या खेळाडूऐवजी संघाला दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला संघात घेता येणार नाही.

या हंगामात चेन्नई संघाला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. हंगाम सुरू होण्यापूर्वी संघाच्या 13 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यात दोन खेळाडूंचा सहभाग होता. त्यांना वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आणि क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत बायो बबलमध्ये आणण्यात आले. याशिवाय अनुभवी सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणांमुळे या हंगामातून माघार घेतली होती.

गुणतालिकेत चेन्नई सध्या शेवटच्या स्थानावर आहे. संघाने तीनपैकी एक सामना जिंकला आहे. त्यांचा पुढील सामना शुक्रवारी (2 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादशी होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---