---Advertisement---

बापरे! इतकी मोठी डाइव्ह तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, सप्टेंबर 30, 2020 7:23 PM
---Advertisement---

२२ सप्टेंबर, इंडियन प्रीमियर लीग २०२०चा चौथा सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थानने १६ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान राजस्थान संघाचा डावखुरा फलंदाज डेविड मिलर हा या सामन्यात शून्य धावांवर धावबाद होत पव्हेलियनला परतला होता.

झाले असे की, चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे राजस्थान संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. दरम्यान सलामीला फलंदाजीसाठी आलेला राजस्थान संघाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल (६ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (७४ धावा) १२व्या षटकापर्यंत बाद झाले.

त्यामुळे मिलर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यावेळी स्ट्राईकवर राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ होता. स्मिथने चेन्नईचा गोलंदाज लुंगी एन्गिडीचा चेंडू मारला आणि तो एक धाव घेण्यासाठी पळाला. अशात नॉन-स्ट्राईकर बाजूला उभा असलेला मिलरदेखील धावला. तेवढ्यात ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव यांनी मिळून त्याला धावबाद केले. मिलरने चेंडू यष्टीला लागण्यापुर्वी मोठी डाइव्ह घेत धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्यात यश आले नाही आणि तो धावबाद झाला.

मिलरला धावबाद होताना पाहिल्यानंतर एका चाहत्याला चेन्नई संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू एल्बी मॉर्केलची आठवण आली. त्या चाहत्याने एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिले की, “२०११ सालचा आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई विरुद्ध राजस्थान संघात झाला होता. त्या सामन्यात मॉर्केल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. दरम्यान फलंदाजी करत असताना तो एका चेंडूवर २ धावा घेण्यासाठी धावला.”

https://twitter.com/CricVideoPedia/status/1311277209286447104?s=20

 

“अशात दूसरी धाव घेताना अचानक त्याच्या हातातून त्याची बॅट सुटली. पण त्याला धावबाद व्हायचे नव्हते. त्यामुळे मॉर्केलने बॅटविना वेगाने डाइव्ह घेत दूसरी धाव पूर्ण केली. एवढेच नाही तर, त्याच मिलरने पुढील चेंडूवर जोरदार षटकार मारत चेन्नईला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला,” असे पुढे त्या चाहत्याने लिहिले. चाहत्याच्या त्या व्हिडिओला अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पंजाबविरुद्च्या विजयाचा नायक ठरलेला तेवतिया म्हणतो, ‘या’ भारतीय गोलंदाजांनी मला खूप मदत केली

IPL २०२०: राजस्थान आणि कोलकाता यांच्यात आज होणार टक्कर, अशी असेल दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

तेवतियाची कमाल! ५ षटकार ठोकल्यानंतर घरच्यांच्या डोक्याला ताप, तब्बल…

ट्रेंडिंग लेख-

चेन्नई-पंजाबला अस्मान दाखवणाऱ्या दिल्लीला हैदराबादने लोळवलं, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’

कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---