क्रिकेट जगतात खेळाडू एकमेकांची नक्कल करताना दिसतात. अशाच प्रकारे भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची तलवारीप्रमाणे बॅट फिरविण्याच्या नक्कल ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने केली होती.
खरं तर वॉर्नरने (David Warner) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक जुना प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आयपीएलमधील सनरायझर्स हैद्राबादच्या संघाच्या जर्सीमध्ये तलवारीसारखी बॅट फिरवताना दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत वॉर्नरने लिहिले की, “मागील वर्षी याच वेळी सनरायझर्स हैद्राबादसाठी एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडिओ. तुम्हाला असे वाटते का की मी जडेजासारखे (Ravindra Jadeja) काहीतरी केले आहे?”
https://www.instagram.com/p/B-tadn2Jb67/?utm_source=ig_web_copy_link
जडेजा ज्यावेळी ५० किंवा १०० धावांचा आकडा पूर्ण करतो, तेव्हा तो आपली बॅट तलवारीसारखी फिरवून आनंद (sword-celebration) साजरा करतो. ही आता जडेजाची स्टाईल बनली आहे. ज्यावेळी वॉर्नरने त्याची नकल केली, त्यावेळी भारतीय चाहत्यांनी म्हटले की, “जवळपास तिथपर्यंत पोहोचला आहेस.”
याव्यतिरिक्त भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि फलंदाज वृद्धिमान साहानेही (Wriddhiman Saha) वॉर्नरच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
वॉर्नर आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळतो. यामध्ये त्याने आतापर्यंत १२६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४३.१७ च्या सरासरीने ४७०६ धावा केल्या आहेत.
आयपीएलची सुरुवात २९ मार्चपासून होणार होती. परंतु कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-या भारतीय गोलंदाजाला खेळणे महाकठीण- स्टिव स्मिथ
-आता भारत- पाकिस्तान नाही तर या दोन दिग्गजांच्या मुलांत होणार सामना
-लहानपणी तुम्ही ऐकलेल्या क्रिकेटबद्दलच्या ५ खोट्या गोष्टी