टी20 क्रिकेटमधील बहुतांश सामन्यात फलंदाजांना वर्चस्व राखताना आपण पाहिलं आहे. क्रिकेटच्या या लहान प्रकारात फलंदाज आक्रमक शैलीत फटके खेळतात. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या प्रकारात जोखीम पत्कारून फटके खेळावे लागतात, त्यामुळे खेळपट्टीवर टिकून खेळने फलंदाजांसाठी मोठे आव्हान असते. परंतु, इंग्लंडच्या डेविड मलान या युवा फलंदाजाने हे आव्हान स्वीकारून सातत्याने धावा फाटकावल्या आहेत.
अशी कामगिरी करणारा मलान ठरला पहिला फलंदाज
इंग्लंडचा युवा फलंदाज डेविड मालनने टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक रेटिंग गुण मिळवून विश्वविक्रम नोंदवला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 900 च्या वर रेटिंग गुण मिळवणारा मलान हा इंग्लंडचा पहिलाच तर जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या टी20 क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत मलान पहिल्या स्थानावर आहे. त्याचे एकूण 915 रेटिंग गुण आहेत. मलाननंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 871 गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे. या दोघांमध्ये 44 गुणांचा फरक आहे.
मलानने मिळवलेल्या 915 रेटींग गुणांमुळे तो आता आयसीसी सार्वकालिन टी20 क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे.
🏏 He started #SAvENG as the World No.1
🏏 He ends it by making historyDawid Malan has just achieved the HIGHEST rating points in T20I history 🤯
📈 UPDATED @MRFWorldwide ICC T20I Rankings: https://t.co/H7CnAiw0YT pic.twitter.com/85sVon3ci2
— ICC (@ICC) December 2, 2020
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली शानदार खेळी
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 1 डिसेंबरला खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात मलानने 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 44 चेंडूत नाबाद 99 धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळेच इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका 3-0 अशी जिंकण्यात यश आले. मलानला या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
मलानला मिळाला मालिकावीर पुरस्कार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संपूर्ण टी20 मालिकेत मलान जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने तीन टी20 सामन्यात 161.68 च्या स्ट्राइक रेटने 173 धावा केल्या. त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
ऍरॉन फिंच 900 रेटिंग गुण मिळवणारा पहिला फलंदाज
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सन 2018 मध्ये 900 रेटिंग गुण मिळवले होते. त्यामुळे तो टी20मध्ये 900 रेटींग गुण मिळवणारा पहिला फलंदाज होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आगामी टी२० मालिकेत धवनसोबत ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग? गावसकरांनी सांगितले नाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे १६ जणांचा भारतीय संघ
विश्वचषक सुपर लीगमध्ये ऑस्ट्रेलियाची अव्वल स्थानी झेप, तर टीम इंडिया ‘या’ क्रमांकावर
ट्रेंडिंग लेख –
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव