आयपीएलमध्ये एकही ट्राॅफी नसताना सर्वाधिक चाहता वर्ग असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे (RCB) नेहमीच जगातील अव्वल खेळाडू असतात, तरीही या संघाला आजपर्यंत आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही. आरसीबीने आयपीएल 2025 साठी एक मजबूत संघ देखील तयार केला आहे. ज्यामध्ये विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि फिल सॉल्टसह अनेक स्टार क्रिकेटपटू आहेत. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा (Syed Mushtaq Ali Trophy) उत्साह भारतात शिगेला पोहोचला आहे. त्यामध्ये आरसीबीचे 2 खेळाडू दहशत निर्माण करत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहेत.
यातील पहिल्या खेळाडूचे नाव रजत पाटीदार (Rajat Patidar) आहे. बंगळुरूने त्याला 11 कोटी रूपयात कायम ठेवले होते. पाटीदार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू हंगामात त्याने आतापर्यंत 6 सामने खेळून 253 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने सुमारे 177च्या तुफानी स्ट्राईक रेटसह 3 अर्धशतके ठोकली आहेत.
या यादीतील दुसरे नाव जितेश शर्माचे (Jitesh Sharma) आहे. ज्याला आरसीबीने लिलावात 11 कोटी रूपयांना विकत घेतले. जितेशने या स्पर्धेत फारशा धावा केल्या नाहीत, मात्र 229च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने विदर्भासाठी नक्कीच कहर निर्माण केला.
नुकत्याच झालेल्या हैदराबादविरूद्धच्या सामन्यात पाटीदारने अवघ्या 16 चेंडूत 36 धावांची तुफानी खेळी केली. दुसरीकडे (3 डिसेंबर) रोजी छत्तीसगडविरूद्धच्या सामन्यात त्याने 14 चेंडूत 3 षटकारांसह 38 धावांची शानदार खेळी खेळली. हे दोघेही फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे यंदा आरसीबीच्या मधल्या फळीत धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रजत पाटीदारने (Rajat Patidar) आपल्या 27 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 799 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने 1 शतक 7 अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, जितेश शर्माच्या (Jitesh Sharma) आकडेवारीवर नजर टाकली तर, त्याने आतापर्यंत 40 आयपीएल सामन्यांमध्ये 730 धावा केल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जितेशने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही अर्धशतक झळकावले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती…!
SMAT; आयपीएल लिलावात अनसोल्ड ठरलेल्या स्टार खेळाडूने झळकावले शानदार शतक
18 वर्षाच्या फलंदाजाने आशिया कपमध्ये रचला इतिहास, उन्मुक्त चंदचा विश्वविक्रम मोडीत