---Advertisement---

लज्जास्पद! कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर धोनीच्या ५ वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमकी

---Advertisement---

नुकत्याच बुधवारी (७ ऑक्टोबर) झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी एमएस धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देण्यात आली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने चेन्नईचा कर्णधार धोनीला सामन्याच्या १७ व्या षटकात ११ धावांवर त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर चेन्नईला विजयासाठी २१ चेंडूत ३९ धावांची आवश्यकता होती. त्यादरम्यान फलंदाजीला आलेला फलंदाज केदार जाधव संघर्ष करताना दिसला. त्याने पूर्ण सामन्यात १२ चेंडू खेळत केवळ ७ धावा केल्या.

चेन्नईला विजयासाठी शेवटच्या षटकात २६ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी पहिले २ चेंडू जाधवने निर्धाव खेळले. आणि तिसऱ्या चेंडूवर धाव घेतली. पुढे रवींद्र जडेजाने फटकेबाजी केली पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. त्यामुळे चेन्नईला सामना गमवावा लागला.

क्रिकेटपटूच्या कुटुंबातील व्यक्तींना धमक्या देण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही क्रिकेटपटूंनी मैदानात चांगली कामगिरी न केल्यामुळे त्यांना धमक्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला सोशल मीडियावर विराटच्या कामगिरीवरून ट्रोल केले आहे.

क्रिकेट हा भारतासह जगभरात लोकप्रिय खेळ आहे. अनेकजण तर या खेळाचे वेडे असतात. परंतु आता यात विकृती देखील येत असल्याचे दिसून येत आहे. या खेळात अत्यंतिक भावनेने गुंतून गेलेले चाहते आता त्यांची सीमा ओलांडताना दिसत आहेत.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीनी हा कोलकाता विरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. मात्र, आता त्याच्या मुलीला बलात्काराची धमकी देणे हे लज्जास्पद असल्याचे बोलले जात आहे.

https://twitter.com/ayushastic/status/1314190016399118336

https://twitter.com/aryansrivastav_/status/1314285911929057280

https://twitter.com/_Shakti_maan/status/1314231984185503749

https://twitter.com/VarunRDCR7/status/1314188103213613057

धोनीला ट्रोल करताना युझर्सने त्याची पाच वर्षांची मुलगी झिवावरही हल्ला केला आहे. तसेच तिच्याबद्दल अपमानजनक संदेश लिहीत बलात्काराच्या धमक्या पोस्ट केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-अविश्वसनीय! थेट गोलंदाजानेच १०० मीटरपर्यंत धाव घेत पकडला झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल

-आयपीएल २०२०: ‘या’ खेळाडूच्या खराब फॉर्ममुळे ट्रोल झाली पत्नी; मग काय दिले सडेतोड प्रत्युत्तर

-एकाच चेंडूवर दोनदा रिव्ह्यू? मुजीबच्या विकेटने वाढवला गोंधळ, पाहा नक्की काय आहे प्रकरण

ट्रेंडिंग लेख-

-IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात स्मिथ, अय्यरसह ‘हे’ ५ खेळाडू करु शकतात खास विक्रम

-हैदराबादने एकहाती जिंकला सामना; जाणून घ्या पंजाबच्या पराभवाची ५ कारणे

-किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---