इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज डॉम सिब्लेने म्हटले आहे की रद्द झालेल्या श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान तो फिटनेसबद्दल जागरुक झाला होता. त्याचमुळे त्याने कोरोना व्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान १२ किलो वजन कमी केले.
इंग्लंड संघाला मार्चमध्ये श्रीलंका दौऱ्यावरुन कोरोना व्हायरसच्या कारणाने कसोटी मालिका रद्द झाल्याने मायदेशी परतावे लागले होते.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत सिब्लेने स्थानिक माध्यमांना सांगितले, ‘श्रीलंकेमध्ये माझ्या कारकीर्दीत प्रथमच मला माझ्या शरीराबद्दल आणि वजनाबद्दल आत्म-जागरूकता झाली. मला आठवतं की विमानात मी विचार करत होतो की आता मला काहीतरी करावे लागेल.’
‘बेन स्टोक्स जेव्हा ट्रेनिंग करतो तेव्हा कठोर परिश्रम करतो. वास्तविक, स्टोक्स, जो रूट आणि जॉस बटलर यांना कोलंबोमध्ये एका सराव सत्रानंतर धावताना पाहिल्यानंतर माझे डोळे उघडले. या खेळाडूंनी तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी केलेली मेहनत पाहिल्यानंतर मलाही वाटले मी सुद्धा काहीतरी केले पाहिजे.
याबरोबरच २४ वर्षीय सिब्ले म्हणाला, ‘संघात असण्यासाठी फिट असलेच पाहिजे, असे गरजेचे नाही. मला वाटते माझ्यासाठी हा एक वेक-अप कॉल होता आणि एक चांगला धडा होता. मग धावा होवोत किंवा नाही. मी फलंदाजी करताना थकत नाही. माझा फिटनेसचा माझ्या फलंदाजीवर परिणाम होत नाही. यामुळे माझी फलंदाजी सुधारावी हे आवश्यक नाही, परंतु यामुळे मैदानावरील क्षेत्ररक्षणादरम्यान माझ्या चपळाईला मदत होईल. वजन कमी केल्याने माझ्या दुखापतीची शक्यता देखील कमी झाली आहे.’
सिब्ले हा कालपासून(८ जूलै) सुरु झालेल्या इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाचा भाग आहे. मात्र तो पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात शुन्य धावेवर शॅनन गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आहे.
त्याने याआधी इंग्लंडकडून ६ कसोटी सामने खेळले असून यात त्याने ४०.२२ च्या सरासरीने ३६२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतकाचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
जे करतात टीम इंडियात विराटची निवड, त्यांच्याच बरोबर कोहली खेळलाय क्रिकेट
होल्डरचा पहिल्या कसोटीत इंग्लंडवर ‘होल्ड’, कर्णधार म्हणून केले ५ खास विक्रम
वाढदिवसाला गांगुलीला घरी मिळाले ६० केक, दिलदार गांगुलीने काय केले पहाच