---Advertisement---

आयपीएलमध्ये विराट-धोनीसारख्या भारतीय दिग्गजांनाच करावा लागणार अडचणींचा सामना; जाणून घ्या कारण

On: बुधवार, सप्टेंबर 9, 2020 4:26 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिसचा असा विश्वास आहे की युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात भारताच्या दिग्गज खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

यावर अधिक स्पष्टीकरण देताना स्टायरिस म्हणाला, “यावेळी आयपीएल रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे आणि यामुळे भारताच्या दिग्गज खेळाडूंना नक्कीच उत्साहाचा अभाव जाणवेल. रिक्त स्टेडियममुळे परदेशी आणि युवा खेळाडूंना फारसा परिणाम होणार नाही.”

कोव्हिड-19 साथीच्या रोगामुळे आयपीएल 2020 युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होईल. जैव-सुरक्षित वातावरणात ही स्पर्धा खेळली जाईल जिथे प्रेक्षकांना स्टेडियमध्ये येण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दिग्गज खेळाडूंना गर्दीची झाली आहे सवय

‘स्टार स्पोर्ट्स’ च्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात स्टायरिसने सांगितले, “परदेशी खेळाडूंना जास्त सामंजस्य बसवावे लागेल असे मला वाटत नाही. बरेच परदेशी खेळाडू नियमित रिकामे मैदान किंवा कमी गर्दीसमोर खेळतात. त्यांना सवय आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “विराट कोहलीसारखे भारतीय खेळाडू जे बर्‍याच दिवसांपासून खेळत आहेत, ते संघर्ष करणार नाहीत परंतु जेव्हा त्यांना उर्जेची आवश्यकता असेल तेव्हा त्यांना आणखी काही मार्ग शोधावा लागेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

-पदार्पणाच्या वर्षातच संघाला एक नव्हे तर दोन ट्रॉफी दिल्या जिंकून, आता तोच खेळाडू बनवेल विराटच्या आरसीबीला विजेता

-या देशातील खेळाडूंना आयपीएलमधील एका तरी सामन्याला लागणार मुकावे; जाणून घ्या कारण

-शाहरूख खानच्या नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी, तर…

ट्रेंडिंग लेख-

-आणि बालपणी ऑटोग्राफ देणाऱ्या क्रिकेटरने पेन नेल्यामुळे ढसाढसा रडलेल्या स्टारची गोष्ट

-तमिळनाडूचा मेकॅनिकल इंजिनीयर आयपीएलमध्ये करोडपती होतो तेव्हा…

-क्रिकेटवेड्या पोरापायी गावातील जमीनदार बाप मोहालीत भाड्याच्या घरात राहू लागला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---