जगभरात पसरलेल्या कोव्हिड-१९ या महामारी दरम्यान इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ५ ऑगस्टपासून दोन्ही संघात सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला. तर दूसऱ्या सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण झाल्याने सामना अनिर्णीत राहिला. कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २१ ऑगस्टला सुरु होईल. त्यानंतर या दोन संघात टी२० मालिका होणार आहे.
२८ ऑगस्टपासून ते १ सप्टेंबरपर्यंत दोन्ही संघात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपुर्वी इंग्लंडने त्यांच्या १४ सदस्यीय टी२० संघाची घोषणा केली आहे. England Team Announces 14 Member T20I Squad
ओएन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंड टी२० संघात दुखापतीतून सावरलेल्या गोलंदाज क्रिस जॉर्डन आणि फलंदाज डेव्हिड मलान यांना संघात सामाविष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत इंग्लंड संघात स्थान मिळाले नव्हते.
याव्यतिरिक्त पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघात जॉनी बेयरस्टो, टॉम बेंटन, सॅम बिलिंग्स, जो डेन्ली आणि जेसन रॉय या फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. तर, लुईस ग्रेगरी, साकिब महमूद आणि आदिल रशीद या गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे.
शिवाय, इंग्लंड टी२० संघात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून मोइन अली, टॉम करन आणि डेव्हिड विली यांना स्थान देण्यात आले आहे.
पाकिस्तान टी२० संघाची इंग्लंडविरुद्ध इंग्लंडच्या मैदानावर आतापर्यंतची कामगिरी जास्त चांगली राहिली नाही. पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये आतापर्यंत ६ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील पाकिस्तानने केवळ २ सामने जिंकले आहेत, तर ४ गमावले आहेत.
असे असले तरी, बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान टी२० संघ पहिल्यांदा इंग्लंडचा सामना करणार आहे. त्यामुळे टी२० क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आपल्या नेतृत्त्वाखाली संघाकडून दमदार प्रदर्शन करुन घेण्यात यशस्वी ठरेल का नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील पहिला टी२० सामना २८ ऑगस्टला मॅनचेस्टर येथे खेळण्यात येणार आहे. तर, दूसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मॅनचेस्टरच्या मैदानावरच पार पडणार आहे.
असा आहे १४ सदस्यीय इंग्लंड टी२० संघ –
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, टॉम बेंटन, सॅम बिलिंग्स, टॉम करन, जो डेन्ली, लुईस ग्रेगरी, क्रिस जॉर्डन, साकिब महमूद, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली.
महत्त्वाच्या बातम्या –
राशिद खान समोर सीपीएलमध्ये असणार या दोन स्फोटक फलंदाजांचे मोठे आव्हान
सीपीएल २०२० ड्रीम ११: बार्बाडोस ट्रायडेंट्स विरुद्ध सेंट किट्स आणि नेव्हीस पॅट्रीयॉट्स
विश्वचषक २०११ फायनलमधील केवळ एक खेळाडू खेळतोय आता भारताकडून, दोघे आजही धडपडताय संघात जागेसाठी
ट्रेंडिंग लेख –
धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा
धोनीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाकडे आहेत या ५ युवा यष्टीरक्षकांचा पर्याय