मुंबई । कोरोना महाभयानक विषाणूने संपूर्ण जगाला मेटाकुटीला आणले आहे. या विषाणूची लागण झाल्याने अनेक लोकांना जीवास मुकावे लागले आहे. या महामारी पासून वाचवण्यासाठी संपूर्ण जग डॉक्टरांकडे आशेने पाहत आहे. संपूर्ण जगभरातील डॉक्टर आपापल्या देशातील बाधित लोकांना बरे करण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी इंग्लंडच्या संघाने सराव करताना काही डॉक्टरांच्या नावाची जर्सी घातली होती.
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि विश्वचषकाचा हिरो अष्टपैलू बेन स्टोक्स याने डॉक्टर विकास कुमार या भारतीय डॉक्टरच्या नावाची जर्सी घातली आहे. खेळाडूंच्या जर्सीवर डॉक्टरांच्या नावानंतर ‘#raisethebat’ असे लिहण्यात आले आहे. डॉ. विकास डरहॅम येथील नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्ट हॉस्पिटलमधील क्रिटीकल केअर युनिटमध्ये कार्यरत आहेत.
डॉ. विकास हे दोन युनिटमध्ये बिझी असतात.
मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून एनेस्थिसिया मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करणारे विकास यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, “सध्याची वेळ ही सर्वांसाठी खूप कठीण आहे. मी मागील वर्षी माझी पत्नी आणि दोन मुलांसह इंग्लंडमध्ये शिफ्ट झालो. मी क्रिकेटचा खूप मोठा फॅन आहे. मेडिकल कॉलेजकडून मी क्रिकेट देखील खेळलो आहे.”
Dr Vikas Kumar is one of the key worker heroes whose name featured on the England Men's training shirts today for day 1 of the #raisethebat Test Series
Watch Vikas view a message from fellow Durham-local Ben Stokes who wore his name with pride today🙌 https://t.co/rQw1yVvynF
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) July 8, 2020
ते पुढे म्हणाले की, “जेव्हा मी स्वतः घरात आयसोलेशनमध्ये होतो, तेव्हा माझी पत्नी माझ्या मुलांचा सांभाळ करत होती. तिचं त्यांच्या सर्वात जास्त जवळ होती.”
England cricketer Ben Stokes wears the name of Darlington doctor Vikas Kumar on his shirt as part of a scheme to honour key workers for their work during the pandemic https://t.co/OygAZEJWfE pic.twitter.com/vNxUi3EbM9
— BBC North East (@BBCNEandCumbria) July 8, 2020
चार महिन्यांच्या नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात झाली आहे. या मालिकेनंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात वनडे आणि टी ट्वेंटी मालिका होणार आहे. कोरोनाच्या सावटात होणार्या या मालिकेकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे.