इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात सहभागी झालेले सर्व ८ संघ प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल करत जीवाचे रान करुन खेळत आहेत. अशात सोमवारी (१९ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात ‘करो या मरो’ सामना झाला. मात्र प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या चेन्नईला पावरप्ले संपायच्या आतच मोठा झटका बसला.
नाणेफेक जिंकत चेन्नईने प्रथम फलंदाजीने निवडली होती. त्यामुळे चेन्नईचे सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिस आणि सॅम करन मैदानावर उतरले. सामन्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे दोन्ही धुरंधर विकेट वाचवून फलंदाजी करत होते. मात्र डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या जोफ्रा आर्चरने जोस बटलरच्या हातून डू प्लेसिसला झेलबाद केले.
आर्चरच्या षटकातील शेवटच्या चेंडूला हवेत टोलवत ४ किंवा ६ धावा संघाच्या खात्यात जमा करण्याच्या उद्देशाने डू प्लेसिसने शॉट कव्हर बाजूला जोरदार फटका मारला. परंतु, तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या बटलरने शानदार डाइव्ह घेत दोन्ही हातांनी चेंडू पकडला. त्यामुळे डू प्लेसिस ९ चेंडूत केवळ १० धावा करत मैदानाबाहेर चालता झाला.
https://twitter.com/ipl2020highlite/status/1318198491437355011
#CSK lose their first wicket. Jofra Archer strikes for #RR. Faf du Plessis goes for 10.
Not the best start #CSK would have wanted. #CSKvRR #IPL2020
— Utter AI (@UtterAI) October 19, 2020
डू प्लेसिसने आयपीएलच्या या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत चेन्नईकडून ९ सामने खेळत ३७५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कमालच म्हणायची! यापूर्वीही मयंक अगरवालने अडवलाय शानदार सिक्सर
‘थाला फक्त एकच…’, चाहत्याच्या कमेंटवर केएल राहुलचे भन्नाट प्रत्युत्तर
सुपर ओव्हरही टाय झाली तर पुढची सुपर ओव्हर कशी टाकायची? ‘असे’ आहेत आयसीसीचे नियम
ट्रेंडिंग लेख-
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’