आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच नकोसा विक्रम आपल्या नावावर करणारा फलंदाज फवाद आलम हा ११ वर्षांनंतर पाकिस्तान कसोटी संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. कारण, येत्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या २० सदस्यीय पाकिस्तान संघात त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ५ ऑगस्टपासून ते २५ ऑगस्टपर्यंत दोन्ही संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. Fawad Alam Comeback After 11 Years In Pakistan Test Team
पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ता मिस्बाह उल हकच्या नेतृत्वाखालील निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानचे फलंदाज इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, फखर जमान आणि हैदर अली यांना कसोटी संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे फवादच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत फक्त ३ कसोटी सामने खेळले आहेत. २००९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध फवादने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
फवादने २००७ साली श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यावेळी आपल्या पहिल्याच सामन्यात फवाद पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. असे असले तरी, तो २०१५पर्यंत पाकिस्तान वनडे संघाचा भाग होता. त्यानंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. त्यानंतर २०१९साली फवाद घर जावई या विनोदी नाटकात कॅमिओची भूमिका बजावताना दिसला.
पाकिस्तान संघातील दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू काशिफ भट्टी आणि यासिर शाह यांच्याजागी फहीम अशरफ आणि शादाब खान यांना संघात जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद हा देखील संघाचा भाग आहेत. या संघाची निवड २९ खेळाडूंमधून करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंमध्ये आपापसात झालेल्या ४ दिवसीय सामन्यानंतर २० सदस्यीय संघाची निवड केली आहे. कोविड-१९मुळे संघाला वेगवेगळ्या गटांमध्ये इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.
२० सदस्यीय पाकिस्तान संघ –
अजहर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), आबिद अली, असद शफीक, फहीम अशरफ, फवाद आलम, इमाम उल हक, इमरान खान, काशइफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह अफरिदी, सोहेल खान, उस्मान शिनवारी, वहाब रियाज आणि यासिर शाह.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या युवराजने ब्रॉडला ६ षटकार ठोकले, तोच युवराज आज ब्रॉडला म्हणतोय…
आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर, तर रोहित आहे ‘या’ क्रमांकावर
आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम
भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…






