मुंबई । एमएस धोनीचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ पाहण्यासाठी संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, हरियाणामधील परी शर्मा या सात वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये ती धोनीप्रमाणे नेमके हेलिकॉप्टरचे शॉट खेळत आहे.
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने लोकांना विचारले आहे की ही मुलगी सुपर टॅलेंट नाही का? माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरसुद्धा या मुलीचे कौशल्य पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
चोप्राने परीच्या फलंदाजीचा 18 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला
18 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये परी एकापाठोपाठ एक हेलिकॉप्टर शॉट मारत आहे. व्हिडिओत आकाश चोप्रा समालोचन करत आहे. परीच्या फलंदाजीवर आकाश म्हणतो की, “शॉटचे नाव हेलिकॉप्टर आहे, पण ती मुलगी रॉकेट आहे. बॅक लिफ्ट आणि शॉटमध्ये काय ताकद आहे?”
मांजरेकर यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “हेलिकॉप्टर शॉट्सचा सराव कसा केला जातो हे मी पाहिले. धोनीने विकेटच्या अगदी जवळ जाऊन चेंडू पकडण्याच्या कौशल्यासह विविध प्रकारचे फलंदाजीचे तंत्र लोकप्रिय केले आहे, जे उदयोन्मुख खेळाडूंसाठी एक चांगला पर्याय आहे.”
Thursday Thunderbolt…our very own Pari Sharma. Isn’t she super talented? 👏👏 #AakashVani pic.twitter.com/2oGLLLAadu
— Aakash Chopra (@cricketaakash) August 13, 2020
परी आपल्या वडिलांकडून घेते फलंदाजीचे धडे
परी ही हरियाणातील रोहतक येथील असून तिचे भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळण्याचे स्वप्न आहे. तिचे वडील प्रदीप शर्मा या 7 वर्षाच्या मुलीला फलंदाजीचे बारकावे शिकवतात. ते स्वत: जोगिंदर शर्मा आणि अजय रात्रासारख्या माजी भारतीय क्रिकेटपटूंबरोबर खेळले आहेत.
नासिर हुसेन आणि मायकेल वॉन यांनीही केली परीची प्रशंसा
दिग्गज क्रिकेटपटूंकडून प्रशंसा होण्याची ही तिची पहिली वेळ नाही. याआधीही परीच्या फलंदाजीचे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतुक केले आहे. यात इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन आणि मायकेल वॉन यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनीची झाली कोरोना चाचणी; पाहा वैद्यकीय अहवाल काय म्हणतो…
-अकरा वर्षांनंतर पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने क्रिकेटमध्ये केले पुनरागमन; झाली अनोख्या विक्रमाची नोंद
-सीपीएल लीगमधील ‘या’ संघाला नाही मिळणार प्रशिक्षक रामनरेश सरवनचे मार्गदर्शन
ट्रेंडिंग लेख-
-या ३ खेळाडूंनी मारलेत सीएसकेसाठी सर्वाधिक षटकार
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास
-असे ५ क्रिकेटर, जे आहेत डावखुरे फलंदाज परंतु करतात उजव्या हाताने गोलंदाजी