---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय: ‘या’ दिग्गजाची प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती

On: गुरूवार, सप्टेंबर 3, 2020 1:42 PM
---Advertisement---

मुंबई । 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पोहचविणारे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांचा करार 3 वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे. आता ते 2023 मध्ये भारतात होणार्‍या वनडे विश्वचषकापर्यंत संघाचे प्रशिक्षक असतील. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी आपला करार वाढविण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

माईक हेसन यांच्या जागेवर 2018 मध्ये 2 वर्षांसाठी स्टेड यांना संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते. हेसन 6 वर्षे न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक होते. आता स्टेड यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ भ‍‍ारतात 2021 आणि ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये होणार्‍या टी20 विश्वचषकात भाग घेईल.

त्यांच्या प्रशिक्षणाखालीच न्यूझीलंडचा संघ 2019च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. पण अंतिम सामन्यात सुपर-ओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे सामन्यात अधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित केले. या नियमांमुळे प्रथम विजेतेपद जिंकण्याचे संघाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

न्यूझीलंड बोर्डाच्या या निर्णयानंतर स्टेड म्हणाले की, “या दोन वर्षात मला खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि बोर्डाचे पूर्ण सहकार्य लाभले आहे. अशी अपेक्षा आहे की, हे असेच पुढे सुरू राहील. एक संघ म्हणून आम्ही अधिक बळकट होत आहोत. भविष्यात आम्हाला अनेक महत्त्वपूर्ण मालिका खेळायच्या आहेत. याबद्दल सर्व खेळाडू खूप सकारात्मक आहेत.  मला आशा आहे की, आम्ही तिन्ही प्रकारात (वनडे, टी20 आणि कसोटी) चांगली कामगिरी करू.”

न्यूझीलंडचा संघ लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांंची टी20 मालिकादेखील खेळणार आहे. याशिवाय बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिकादेखील नियोजित आहेत. नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज संघाचा न्यूझीलंड दौरा आहे. या मालिकेसाठी तिन्ही देशांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी सहमती दर्शविली आहे. तथापि, जेव्हा कोरोना नियंत्रणाखाली येईल तेव्हाच ही मालिका होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

-माझा रैनावर काहीही अधिकार नाही, त्याच्या कमबॅकचा निर्णय घेणार हा व्यक्ती

-दिग्गजाने निवडले ५ भारतीय खेळाडू, जे घेऊ शकतात सुरेश रैनाची जागा

-आजवर एकदाही आयपीएल विजेता न ठरलेल्या संघाचा कॅप्टन म्हणतोय, मी रोहित-धोनीकडून नेतृत्त्वाचे धडे गिरवलेत

ट्रेंडिंग लेख-

-किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप

-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट

-तिशीतच आयर्लंडचा दिग्गज झालेला पॉल स्टर्लिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---